अंगणवाडीत १७ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश
By admin | Published: June 28, 2017 12:18 AM2017-06-28T00:18:28+5:302017-06-28T00:18:28+5:30
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने मंगळवारी जिल्हाभरातील सुमारे २ हजार ५०० अंगणवाडी केंद्रात १७ हजार बालकांना पहिल्याच दिवशी प्रवेश देण्यात आला.
चिमुकल्यांचे स्वागत : २५०० केंद्रांमध्ये रंगला प्रवेशाचा सोहळा, पालकही उत्साही
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने मंगळवारी जिल्हाभरातील सुमारे २ हजार ५०० अंगणवाडी केंद्रात १७ हजार बालकांना पहिल्याच दिवशी प्रवेश देण्यात आला. हा अभिनव उपक्रम महिला, बालकल्याण विभागाने प्रथमच सुरू केला आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये सुमारे २ हजार ५०० अंगणवाडी केंद्र आहेत. प्रत्येक अंगणवाडीत शाळेच्या पहिल्या दिवशी विविध अभिनव उपक्रम राबविण्यात आले. अंगणवाडीत चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभर राबविण्यात आला. यावेळी अंगणवाडी केंद्रात प्रवेशानिमित्त चिमुकल्यांची बैलगाडी, टांगा, आॅटो, दुचाकीवरून मिरवणूक काढण्यात आली. याउपक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व पालकांनी सहभाग घेतला. या अभिनव उपक्रमामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी १७ हजार मुलांना प्रवेश देण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालकांनीही शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी शासनाच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिला व बालकल्याण विभागाने अभिनव उपक्रम राबविले. यात लोकप्रतिनिधींसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे पहिल्याच दिवशी १७ हजार मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
- कै लास घोडके,
उपमुख्यकार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग