कृषी घटकांसाठी जिल्ह्यास १.७१ कोटींचे लक्ष्यांक
By admin | Published: July 14, 2017 12:40 AM2017-07-14T00:40:31+5:302017-07-14T00:40:31+5:30
जिल्ह्यास एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत घटकनिहाय बाबीकरिता एक कोटी ७१ लाख ५५ हजारांचे लक्ष्यांक प्राप्त झाले आहे.
अभियान : आॅनलाईन अर्जासाठी ३१ जुलै "डेडलाईन"
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यास एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत घटकनिहाय बाबीकरिता एक कोटी ७१ लाख ५५ हजारांचे लक्ष्यांक प्राप्त झाले आहे. वैयक्तिक शेतकरी, उद्योजक व संस्था यांना हा लाभ मिळणार आहे. यासाठी संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सहाय्याने अर्ज सादर करता येणार आहे.
एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत सन २०१७-१८ करिता जिल्ह्यास क्षेत्र विस्तार घटकांतर्गत फुलशेती, सघन लागवडअंतर्गत संत्रा पुनरूज्जीवन, सामूहिक शेततळे, संरक्षित शेती घटकांतर्गत शेडनेट हाऊस, पॉलीहाऊस, सामूहिक शेततळे, काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत पॅक हाऊस, रायपनिंग चेंबर, शीतगृह उती संर्वधन प्रयोगशाळा या घटकनिहाय बाबीकरिता जिल्ह्यास एक कोटी ७१ लाख ५५ हजारांचे लक्ष्यांक प्राप्त आहे. या सर्व घटकासाठी पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे. ज्या तारखेला आॅनलाईन अर्ज केला आहे, तीच तारीख या योजनेसाठी अर्ज प्राप्त झाल्याची तारीख समजण्यात येईल.