मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू; परिस्थिती आजही चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 04:10 PM2019-06-14T16:10:58+5:302019-06-14T16:12:57+5:30

मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू झाले आहेत. मागील वर्षी २०१८-१९ मध्ये ४०९ बालमृत्यू झाले. यात १९७ उपजत तसेच १४ मातामृत्यू आहेत. एप्रिल २०१९ मध्ये नऊ उपजत मृत्यू व एका मातामृत्यूची नोंद झाली आहे. 

1,727 child deaths in four years in Melghat; The situation is still worrisome | मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू; परिस्थिती आजही चिंताजनक

मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू; परिस्थिती आजही चिंताजनक

googlenewsNext

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू झाले आहेत. मागील वर्षी २०१८-१९ मध्ये ४०९ बालमृत्यू झाले. यात १९७ उपजत तसेच १४ मातामृत्यू आहेत. एप्रिल २०१९ मध्ये नऊ उपजत मृत्यू व एका मातामृत्यूची नोंद झाली आहे. 
मृत्यूची कारणे वेगवेगळी असली तरी आजही मेळघाटातील आरोग्यस्थिती चिंताजनक आहे. मागील दोन वर्षात २.५ किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या जन्मास आलेल्या बालकांची संख्या १ हजार १४२ आहे. यात धारणी तालुक्यातील ७२९, तर चिखलदरा तालुक्यातील ४१३ बालकांचा समावेश आहे.

जन्मास आलेल्या शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ५४६ मुले तीव्र कुपोषित आहेत. यातील १६३ मुले अतितीव्र कुपोषित असून, ३८३ अतिमध्यम तीव्र कुपोषित आहेत. ७९६ मुलांचे वजन कमी असून, यात अतितीव्र कमी वजनाच्या ३०२, तर मध्यम कमी वजनाच्या ४९४ बालकांचा समावेश आहे. 

मेळघाटातील ४६७ अंगणवाडी केंद्रांमधून संदर्भ सेवा व पोषण आहार पुरवित कुपोषण निर्मूलन व बालमृत्यू रोखण्याकरिता प्रयत्न आहेत. पण, अंगणवाडी केंद्राचे रेकॉर्डनुसार शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ४३४ मुले आजही अतितीव्र कुपोषीत असून, अतिमध्यम तीव्र कुपोषीत मुलांची संख्या २ हजार ८७६ आहे. यात एकूण ३ हजार ३१० मुले कुपोषित आहेत.

मेळघाटास एकूण शून्य ते सहा वर्षे वयोगटात ३६ हजार ९७ मुले आहेत. यातील धारणीत २२ हजार ३४४, तर चिखलदºयात १३ हजार ७५३ मुलांचा समावेश आहे. अंगणवाडीत यातील ३० हजार ५३१ मुलांचे वजन आणि उंची नोंदविली गेली. यात २ हजार ७२५ मुले अतितीव्र कमी वजनाची आहेत, तर ८६ मुलांना दुर्धर आजाराने ग्रासले आहे. या बालकांसोबतच ४४ लोक गलगंडने त्रस्त आहेत. मेळघाटात चिखलदरा तालुक्याच्या तुलनेत धारणी तालुक्यात कुपोषित मुलांची अधिक आहे. 

गतवर्षी दीड हजार प्रसूती घरीच 
मेळघाटात गर्भवती माता दवाखान्याऐवजी घरीच प्रसूत होत आहेत. एप्रिल १८ ते मार्च १९ दरम्यान मेळघाटात १ हजार ५७० प्रसूती घरी झाल्या आहेत. यात धारणी तालुक्यातील प्रसूतीची संख्या ९३४, तर चिखलदरा तालुक्यातील संख्या ६३६ आहे. 

पोषण आहारात पिवळा भात
सन २०१८-१९ मध्ये मेळघाटातील सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील २७ हजार ८४१ मुलांना अमृत आहार योजनेंतर्गत लाभ दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. पण, प्रत्यक्षात मागील महिन्याभरापासून मेळघाटातील अनेक अंगणवाडी केंद्रात पोषण आहारांतर्गत साधा पिवळा भातच दिला जात आहे. त्यात तेल नाही, दाळ नाही, उसळ नाही. अंगणवाड्यांमधल तेल, दाळ, तांदूळसह पूरक साहित्य संपुष्टात आले आहे.

बालविकास केंद्र दुर्लक्षित
बालमृत्यू रोखण्याकरिता मातेसह बालकाला आरोग्य सेवेसह अन्य सेवा पुरविणारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील बालविकास केंदे्र मेळघाटात वृत्त लिहिस्तोवर सुरू झालेली नाहीत. मेळघाटातील चिखलदरासह अन्य भागांना जवळ पडणाºया अचलपूर रुग्णालयात विचाराधीन एनआरसी केंद्र अद्यापही दुर्लक्षित आहे. फिरते पथक, त्यांच्याकडील गाड्या त्यांचे सोयीच्या ठिकाणी असलेले मुक्काम आणि अ‍ॅॅम्ब्यूलन्स यावरही प्रश्न उपस्थित करून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

अँड्रॉइड अंगणवाडी; नेटवर्कची बोंब
कुपोषण निर्मूलन व बालमृत्यू रोखण्याकरिता अंगणवाडीतील अभिलेख डिजिटाइज्ड करण्याकरिता मेळघाटातील ४६७ अंगणवाड्यांना अँड्राइड बेस्ड मोबाइल फोन डाटा प्लॅन सिमकार्डसह पुरविण्यात आले आहेत. पण, मेळघाटातील डोंगरदºयातील दुर्गम आदिवासी भागात मोबाइल नेटवर्क मिळत नाही. अनेक ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नाही. यात सर्वच त्रस्त आहेत.

Web Title: 1,727 child deaths in four years in Melghat; The situation is still worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.