जिल्ह्यात १७३९ जणांना सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:13+5:302021-01-02T04:11:13+5:30
इंदल चव्हाण अमरावती : जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान १७३९ जणांना सर्पदेशाच्या घटना घडल्यात. यात २० जण दगावल्याची नोंद ...
इंदल चव्हाण
अमरावती : जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान १७३९ जणांना सर्पदेशाच्या घटना घडल्यात. यात २० जण दगावल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयाने घेतली आहे.
अमरावती जिल्ह्यात चार प्रकारचे विषारी सार प्रकर्षाने आढळतात. यातील फुरसे प्रजातीचा साप पहाडी भागात, घोषण, मन्यार आणि नाग हे थंड व काळ्या मातीच्या भागात आढळतात. मागील वर्षी ३६०४ सर्पदंशाच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी ३१ जण दगावले, तर यंदा जानेवारी ते नोव्हेंबर अशा ११ महिन्यांत १७३९ जणांना सर्पदंश झाला. त्यापैकी २० जणांना वेळीच उपचार न मिळू शकल्याने प्राणाला मुकावे लागले. यामध्ये अमरावती तालुक्यात १०४५ सर्पदंश झाले असून, १५ जणांचा मृत्यू झाला. तिवसा तालुक्यात १२७ घटना घडल्या. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. अंजनगाव सुर्जी - २७ पैकी दोघांचा मृत्यू व वरूडमध्ये ९४ घटनांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आलेली आहे.
तालुकानिहाय सर्पदंश
धारणी २७
अंजनगाव सुर्जी १७
चांदूर रेल्वे २३
चिखलदरा ३
धामणगाव रे. ३२
तिवसा ३४
अमरावती १०४५
नांदगाव खं. ४१
भातकुली १
वरूड ९४
अचलपूर १७५
मोर्शी ५२
चांदूर बाजार ४२
दर्यापूर २३
बॉक्स
अमरावती जिल्ह्यात विषारी, अतिविषारी आणि बिनविषारी सापांच्या प्रजाती आढळून येतात. विषारीमध्ये फुरसे, घोणस, मन्यार आणि नागाचा समावेश आहे. यातील फुरसे हा पहाडी भागात नेरपिंगळा, छत्रीतलाव, मेळघाटात आढळतो. इतर ठिकाणी तीन प्रकारचे विषारी साप आढळतात. तसेच बिनविषारी सापांच्या प्रजाती जिल्ह्यात धामण, हरणटोळ, भारतीय अंडीखाऊ साप, जाडरेती, मांजऱ्या, तस्कर, ब्रँडेडकुकरी, धूळनागीण यांचा समावेश आहे.
साप चावता घ्यावयाची काळजी
साप चावलेल्या अवयवापासून काही अंतरावर धमणी बंद राहील अशा पद्धतीने कापडाने बांधून घ्यावे. मनोधैर्य अजिबात खचू न देता वैदूच्या मोहात न पडता थेट शासकीय रुग्णालयात पोहचावे. कारणी विषारी सापावर योग्य उपचार इतरत्र नसून अँटी स्नेक व्हेनम शासकीय रुग्णालयातच उपलब्ध असतात. उपचारादरम्यान डॉक्टरांना समजावी, अशा पद्धतीने माहिती दिल्यास योग्य आणि वेळीच उपचार करण्यास मदत होईल, असे सर्पमित्रांनी सांगितले.
जिल्ह्यात लसींचा पुरवठा पुरेसा
जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रांत तीन महिन्यांच्या ॲव्हरेजनुसार स्नेक अँटीव्हेनॉमस सिररमचा पुरवठा तेथील डॉक्टरांच्या मागणीवरून केला जातो. सध्या १७०० व्हायल उपलब्ध असून मागणीनुसार प्रत्येक आरोग्य केंद्रावर त्या पोहचविण्यात येतात, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील फार्मसी ऑफिसर योगेश वाडेकर यांनी दिली.
साप चावल्याचे बळी सन २०१९ - ३१
सन २०२० - २०