१७५ जणांनी केला नेत्रदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:21+5:302021-06-11T04:10:21+5:30
फोटो जे -१०- नेत्रदान हरिनाअमरावती : हरिना नेत्रदान समितीतर्फे जागतिक नेत्रदान दिनानिमित्त आयोजित अभिनव उपक्रमात एक मिनिट डोळ्यावर काळी ...
फोटो जे -१०- नेत्रदान हरिनाअमरावती : हरिना नेत्रदान समितीतर्फे जागतिक नेत्रदान दिनानिमित्त आयोजित अभिनव उपक्रमात एक मिनिट डोळ्यावर काळी पट्टी बांधून नेत्रहिनांच्या वेदनांचा अनुभव घेण्यात आला. यामध्ये १७५ जणांनी मरनोपरांत नेत्रदानाचा संकल्प केला. यावेळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हिरीरीने सहभाग दर्शविला.
जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून नेत्रदानाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने अमरावतीच्या हरिना नेत्रदान समितीतर्फे एहसास करे नेत्रहिन का दर्द या कार्यक्रमाचे गुरुवारी सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एक मिनिटासाठी डोळ्यावर काली पट्टी बांधून काय अनुभव येतो, यावरून ज्यांना दृष्टीच नाही त्यांची व्यथा काय असेल, याचा अनुभव घेऊन त्यांनाही जग पाहता यावे. यासाठी मरनोपरांत नेत्रदान व अवयव दानाचा संकल्प करण्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण व्हावी. त्यांच्या माध्यमातून दृष्टीहिनांना जग पाहण्याची संधी मिळावी, हा यामागील उद्देश आहे. दरम्यान हिरना नेत्रदान समितीच्या खापर्डे बगिचा स्थित स्व. मंगलभाई पोपट नेत्रालयात सिनेसृष्टीतील कलाकार शशांक उदापूरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
बॉक्स
शहरात विविध ठिकाणी संकल्प
हरिना नेत्रदान समितीतर्फे गुरुवारी आयोजित एहसास करे नेत्रहिन का दर्द हा कार्यक्रमात शहरातील खापर्डे बगिचा, इर्विन रुग्णालय, एसपी कार्यालय, आमदार रवि राणा यांच्या निवासस्थानी, आ. सुलभा खोडके यांचे निवासस्थान, बीजेपी कार्यालय, शहर काँग्रेस कार्यालय, महापालिका आयुक्त कार्यालय, शिवसेना कार्यालयात एकाच वेळी राबवून नेत्रदानाचा संकल्प करण्यात आला.