१७६४ शेतकऱ्यांनी केली कापसाची ऑनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 01:35 AM2020-06-08T01:35:09+5:302020-06-08T01:35:40+5:30

कोरोना विषाणूने सर्वांना हादरून टाकले आहे. यामध्ये मात्र कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील शेतकºयांच्या घरी अजूनही हजारो क्विंटल कापूस पडून आहे. चांदूर बाजार तालुक्यात पेरणीयोग्य एकूण क्षेत्रफळ ५८,६९६ हेक्टर क्षेत्र आहे. सन २०१९-२० मध्ये खरीप हंगामात एकूण क्षेत्रफळापैकी २३ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रफळावर शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली.

1764 Farmers register cotton online | १७६४ शेतकऱ्यांनी केली कापसाची ऑनलाईन नोंदणी

१७६४ शेतकऱ्यांनी केली कापसाची ऑनलाईन नोंदणी

googlenewsNext
ठळक मुद्देपेरणीचे मोठे संकट : हजारो क्विंटल कापूस अजूनही घरातच पडून

लोकमत न्यूज नेटवर्क
तळवेल : कोरोनामुळे जाहीर केलेल्या संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात पणनचे खरेदी केंद्र बंद राहिल्याने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झालाच नाही. यामुळे कापूस उत्पादकांवर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यांना सावरण्यासाठी पणनने नोंदणीची तारीख ३ जून ते ६ जूनपर्यंत वाढविल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यामध्ये तालुक्यामधील १७६४ शेतकऱ्यांनी कापसाची ऑनलाइन नोंदणी केली, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदूर बाजारचे सचिव मनीष भारंबे यांनी दिली.
कोरोना विषाणूने सर्वांना हादरून टाकले आहे. यामध्ये मात्र कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरी अजूनही हजारो क्विंटल कापूस पडून आहे. चांदूर बाजार तालुक्यात पेरणीयोग्य एकूण क्षेत्रफळ ५८,६९६ हेक्टर क्षेत्र आहे. सन २०१९-२० मध्ये खरीप हंगामात एकूण क्षेत्रफळापैकी २३ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रफळावर शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली. मार्चपर्यंत कापसाचे उत्पादन सुद्धा घरी आले. यावेळेस मात्र कापसाच्या उत्पादनात वाढ झाल्याने तालुक्यातील शेतकरी आनंदित होते. आनंदामध्ये शेतकऱ्यांनी कापसाच्या खरेदीची ऑनलाइन नोंदणीसुद्धा केली परंतु खरेदीचा मुहूर्त निघालाच नाही. काही शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी झाली. परंतु पैसेच मिळाले नाही. अशा अनेक समस्यांना शेतकºयांना तोंड द्यावे लागत आहे.
चांदूर बाजार तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्विंटल कापूस पडून आहे. कोरोना विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामध्ये कापूस खरेदीसुद्धा बंद असल्याने यावर्षी कापूस खरेदीला अनेक अडथळे निर्माण झाले. संचारबंदीच्या काळात खासगी कापूस खरेदी करणाऱ्यांनासुद्धा परवानगी नव्हती. त्यामुळे अडचणीत आणखी भर पडली. काही शेतकऱ्यांनी खरेदीची नोंदणीसुद्धा केली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधीकडे तक्रारी केल्यात. त्यांच्या अतोनात प्रयत्नांनंतर कुठे पणन महामंडळाद्वारा पुन्हा ३ ते ६ जूनपर्यंत नोंदणी करण्यासाठी काही वेळ वाढून देण्यात आला होता. यामध्ये तालुक्यातील १७६४ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या नोंदणी प्रक्रियेत सहभाग दर्शविता आला आहे.

Web Title: 1764 Farmers register cotton online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस