१८ ग्रापंची निवडणूक तूर्तास रद्द
By Admin | Published: March 29, 2015 12:19 AM2015-03-29T00:19:34+5:302015-03-29T00:19:34+5:30
जिल्ह्यात मे ते आॅगस्ट दरम्यान मुदत संपणाऱ्या ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने २४ मार्चला जाहीर केला होता.
अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅगस्ट दरम्यान मुदत संपणाऱ्या ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने २४ मार्चला जाहीर केला होता. परंतु पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकत नसल्याने आॅगस्ट महिन्यात कालावधी संपणाऱ्या १८ ग्रामपंचायतीच्या निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहे. यामुळे जिल्ह्यात ५३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक व ५० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक घोषित कार्यक्रमाप्रमाणेच होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मे ते आॅगस्ट दरम्यान मुदत संपणाऱ्या ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहिर केला होता. यासाठी ३० जानेवारीला नोटीस काढण्यात येत होती. परंतु नाशिक येथे कुंभमेळा असल्याने पुरेसे पोलीस दल व अर्ध सैनिक दल उपलब्ध होणार नाहीत तसेच मे व जून महिन्यात उन्हाळी सुट्यामुळे निवडणुकांसाठी पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार नाही. या कारणामुळे आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नये, असे आदेश आयोगाने २७ मार्चला बजावले आहेत. हा कार्यक्रम स्वतंत्ररित्या आयोगाकडून यथावकाश जाहिर करण्यात येणार आहे.
त्यामुळे आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या १८ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सोमवार ३० मार्चला जाहिर होणार नाही. मात्र २४ मार्चला जाहिर केलेल्या ५० पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मात्र पूर्ववतच राहणार आहे. सुधारित आदेशानुसार जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील १, नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील ७, चांदूररेल्वे तालुक्यामधील १, धामणगाव तालुक्यामधील २, अचलपूर तालुक्यामधील १, धारणी तालुक्यातील १, चिखलदरा तालुक्यामधील ५ अश्या १८ ग्रामपंचायतीच्या निवडणूक पुढे आयोगाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आले आहे. यामुळे विविध चर्चांना उत आला आहे. (प्रतिनिधी)
निवडणूक पुढे ढकललेल्या ग्रामपंचायती
भातकुली तालुक्यामधील बोरखडी (खुर्द), नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील जळू (कंझरा), बेलोरा हिरापूर, वडूरा, फुलआमला, पळसमंडळ, शिरपूर, चांदूररेल्वे तालुक्यामधील येरड, धामणगाव तालुक्यामधील नायगाव, ऊसळगव्हाण, अचलपूर तालुक्यामधील वझ्झर, धारणी तालुक्यामधील चेंडो, चिखलदरा तालुक्यामधील सोमठाणा, काकाझरी, खटकाली, अढाव, माखला या ग्रामपंचायतीच्या निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहे.