कास्तकारांना स्वनिधीतून १८ कोटींचे तारण कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:21 AM2021-02-18T04:21:22+5:302021-02-18T04:21:22+5:30
दर्यापूर कृषिउत्पन्न बाजार समितीची वार्षिक आमसभा, उत्पन्न वाढविण्यावर देणार भर दर्यापूर : येथील कृषिउत्पन्न बाजार समितीची अठरावी वार्षिक आमसभा ...
दर्यापूर कृषिउत्पन्न बाजार समितीची वार्षिक आमसभा, उत्पन्न वाढविण्यावर देणार भर
दर्यापूर : येथील कृषिउत्पन्न बाजार समितीची अठरावी वार्षिक आमसभा संस्थेचे अध्यक्ष बाबाराव बरवट यांच्या अध्यक्षतेखाली व आ. बळवंत वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
संस्थेच्या प्रगतीचा आलेख सचिव हिंमतराव मातकर यांनी प्रास्ताविकाद्वारे सादर केला. संस्थेच्या मालकीचा पेट्रोल पंप व व्यापारी संकुलामुळे उत्पन्नात भरपूर भर पडली आहे, असे त्यांनी सांगितले. उपसभापती नरेंद्र ब्राह्मणकर, बांधकाम सभापती अशोक मोहता, संचालक सुधाकर भारसाकडे, अरुण गावंडे, जिल्हा परिषद आरोग्य सभापती, संचालक बाळासाहेब हिंगणीकर, कुलदीप गावंडे, राजेश वडाळ, मीरा होले, रेखा गावंडे, साहेबराव भदे, सतीश साखरे, कपिल देवके, राजू धुरंधर, गोपाल अरबट, हर्षवर्धन शहा, सदरूद्दीन शमसुद्दीन, अनिल जळमकर, रेखा चव्हाण, पप्पू होले तसेच सर्व संचालक आमसभेला उपस्थित होते.
बाजार समितीने शेतमाल तारण योजनेत स्वनिधीतून कास्तकारांना यंदा १८ कोटी ४७ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. संस्थेतर्फे खल्लार, येवदा येथेही पेट्रोल पंप उभारण्याचा मानस आहे. सर्व संचालकांच्या सहकार्यामुळे संस्थेचा भरभक्कम विकास होऊ शकला, असेही सभापती बाबाराव बरवट यांनी आढावा वाचनात सांगितले. शासनाच्या मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करूनच आमसभा पार पडली.