कपाशीला ‘एनडीआरएफ’चे १८३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 09:07 PM2018-01-08T21:07:03+5:302018-01-08T21:07:37+5:30

गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.४८ टक्के क्षेत्रातील कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला.

183 crores of 'NDRF' in Kadashi | कपाशीला ‘एनडीआरएफ’चे १८३ कोटी

कपाशीला ‘एनडीआरएफ’चे १८३ कोटी

Next
ठळक मुद्देबोंडअळीचे नुकसान : ८९.४८ टक्के क्षेत्रात प्रादुर्भाव, शासनाला अहवाल

आॅनलाईन लोकमत
अमरावती : गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.४८ टक्के क्षेत्रातील कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला. त्याअनुषंगाने जिरायती व बागायती क्षेत्रातील बाधित कपाशीच्या मदतीसाठी केंद्राच्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे १८२ कोटी २६ लाखांच्या मदतीची मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शासनाकडे केली आहे.
यंदाच्या हंगामात २ लाख २१ हजार ४१५ शेतकºयांनी २ लाख २२ हजार ५८६ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटाने ८९.४८ टक्के म्हणजेच १ लाख ९९ हजार १७२ हेक्टर क्षेत्रात कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती कपाशीचे १ लाख ३० हजार ८२९ हेक्टर, तर बागायती कपाशीचे ६८ हजार ३४३ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रुपये याप्रमाणे ८९ कोटी ६१ लाख ११ हजार, तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये याप्रमाणे ९२ कोटी ९८ लाख ९२ हजारांची मदत आवश्यक आहे. हे नुकसान केंद्राच्या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी पात्र आहे.
बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी गुलाबी बोंड अळीने बाधित क्षेत्र पंचनाम्याचे आदेश ७ डिसेंबरला जिल्ह्यधिकाºयांनी सर्व तालुका यंत्रणांना देऊन अहवाल मागविला. ५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कपाशीच्या बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या अनुषंगाने कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व तुडतुड्यांमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव सु.ह. उमरीकर यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांना दिलेत. याच पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सर्व तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकारी यांना बाधित कपाशीचे पंचनामे करून संयुक्त अहवाल मागविला होता. हा अहवाल सोमवारी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला व त्यानंतर शासनाला सादर होणार आहे. बोंड अळीबाधित क्षेत्राचे अहवाल सादर झाल्यानंतर राज्य शासन केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव सादर करणार आहे. त्यानंतरच अटी-शर्तींच्या निकषामध्ये केंद्राची मदत प्राप्त होणार आहे.
जिल्ह्यात १.९१ लाख हेक्टर बाधित
बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार १७२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. दर्यापूर तालुक्यात २६,५०३ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६,१७१, अमरावती ५,९८०, चांदूर बाजार १४,४०८, भातकुली ७,२३५, अंजनगाव सुर्जी १४,८८७, धारणी ९,६६१, चिखलदरा १,२२७, चांदूर रेल्वे ९,१६५, धामणगाव रेल्वे ३२,३०४, मोर्शी १९,३३९, वरूड २३,६०८, तिवसा १२,०९० व अचलपूर तालुक्यात २३,६०८ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल आहे.
तालुकानिहाय आवश्यक भरपाई
जिल्ह्यात बोंड अळीमुळे १८२ कोटी २६ लाख रूपयांची मदत आवश्यक आहे. यामध्ये भातकुली तालुक्यात ५.५० कोटी, अमरावती ७.५५ कोटी, चांदूर रेल्वे ६.१८ कोटी, धामणगाव रेल्वे २१.९४ कोटी, नांदगाव खंडेश्वर ७.८६ कोटी, मोर्शी १९.२२ कोटी, वरूड २७.९४ कोटी, चांदूर बाजार १५.३४ कोटी, तिवसा १२.६३ कोटी, अचलपूर १८.७१ कोटी, अंजनगाव सुर्जी १४.९१ कोटी, दर्यापूर १६.९७ कोटी, धारणी ६.७७ कोटी व चिखलदरा तालुक्यात १ कोटी रुपयांची मदत आवश्यक आहे.

Web Title: 183 crores of 'NDRF' in Kadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.