१८७ गावांत पाणी टंचाई
By admin | Published: April 5, 2017 12:09 AM2017-04-05T00:09:30+5:302017-04-05T00:09:30+5:30
यंदा एप्रिल ते जून या कालावधीत १८७ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे. टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत.
दाहकता वाढली : विविध योजनांवर ३ कोटींचा खर्च अपेक्षित
अमरावती : यंदा एप्रिल ते जून या कालावधीत १८७ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे. टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत. यावर दोन कोटी ९५ लाख ९९ हजारांचा खर्च होणार आहे.
या कालावधीमध्ये ८३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यावर २७ लाख ३९ हजारांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १४, भातकुली ४, तिवसा ११, मोर्शी १४, वरूड ४, चांदूररेल्वे २५, धामणगाव ४, धारणी २ व चिखलदरा तालुक्यात ६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. चिखलदरा तालुक्यातील ७ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यावर १० लाख ५० हजारांचा खर्च येणार आहे.
३० नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. यावर ८५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. अमरावती तालुक्यात ४, भातकुली ४, तिवसा ६, वरूड १, चांदूररेल्वे ८, अचलपूर तालुक्यातील ७ योजनांचा समावेश आहे. १३ तात्पुरत्या पूरक नळ योजना तयार करण्यात येणार आहे. यावर १३ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. अमरावती, तिवसा व वरूड तालुक्यात प्रत्येकी १ व अचलपूर तालुक्यात ७ योजनांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
विंधन विहिरी, कूपनलिकांवर एक कोटींचा खर्च
यंदा पाणीटंचाई निवारणार्थ ८२, नवीन विंधन विहिरी व कूपनलिका तयार करण्यात येणार आहे. यावर एक कोटी १ लाख ५० हजारांचा खर्च होणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३० कूपनलिका अचलपूर तालुक्यात तयार करण्यात येणार आहे. अमरावती १७, भातकुली ३, धामणगाव रेल्वे ४, चिखलदरा २ व धारणी तालुक्यात २३ विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे.