अमरावती मध्यवर्ती कारागृहाला मिळाले १९ कोटी; वॉल कम्पाऊंड, रस्ते अन् होणार विद्युतीकरण

By गणेश वासनिक | Published: February 8, 2024 06:14 PM2024-02-08T18:14:37+5:302024-02-08T18:15:21+5:30

कारागृह प्रशासनाचे महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी या विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर रिक्त पदभरती, बंदीजनांसाठी पायाभूत सुविधा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवासस्थानांचे प्रश्न मार्गी लावल्यास प्राधान्य दिले आहे.

19 crores to Amravati Central Jail; Wall compound, roads and electrification will be done | अमरावती मध्यवर्ती कारागृहाला मिळाले १९ कोटी; वॉल कम्पाऊंड, रस्ते अन् होणार विद्युतीकरण

अमरावती मध्यवर्ती कारागृहाला मिळाले १९ कोटी; वॉल कम्पाऊंड, रस्ते अन् होणार विद्युतीकरण

अमरावती: येथील ब्रिटीशकालीन मध्यवर्ती कारागृहात विविध कामांसाठी गृह विभागाने १९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात महत्वाचे म्हणजे कारागृह परिसराला संरक्षण भिंत साकारली जाणार असून बाह्य रस्ते निर्मितीसह एकुणच परिसरात विद्युतीकरण करण्यात येणार आहे. तसेच २०४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा कारागृह परिसराला वेढा असणार आहे. आता कारागृह अधिकारी-कर्मचारी, कैद्यांच्याही बारीकसारीक बाबी कॅमेऱ्यात कैद होणार आहे.

कारागृह प्रशासनाचे महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी या विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर रिक्त पदभरती, बंदीजनांसाठी पायाभूत सुविधा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवासस्थानांचे प्रश्न मार्गी लावल्यास प्राधान्य दिले आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या बाह्य भागात नागरीवस्ती असल्यामुळे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा मोठा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या रिंगरोडवरून गांज्याचे बॉल निरंतरपणे येत असल्याचे उघडकीस आले आहे. नेमके हे गांज्याचे बॉल नेमके कोणासाठी येतात, बंदीजनांपर्यंत कोण पोहोचतो? हा संशाेधनाचा विषय आहे. तथापि, कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी एकूणच परिसराला आवार संरक्षण भिंत बांधकाम १३, ७७, ८०, ५५६ रूपये निधी, बाह्य रस्ते आणि विद्युतीकरणासाठी ५, ४६, ५५, ६९४ ईतक्या पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून निधीला देखील ७ फेब्रुवारी रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

२०४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वेढा
कारागृहाच्या आत आणि बाहेरील भागात बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आता २०४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्याकरिता स्वंतत्र निधी मंजूर झाला आहे. अधिकारी, कर्मचारी, बंदीजन यासह एकूण महत्वाच्या घडामोडींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
असणार आहे. प्रवेशद्वारापासून तर आतील परिसर, मागील बाजुकडील महामार्गावर, चांदूर रेल्वे मार्ग, वडाळी रस्ता, मुख्य दर्शनी भाग, वसाहतीचा भाग, शेतीचा परिसर आदी महत्वाचे परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार आहे.

Web Title: 19 crores to Amravati Central Jail; Wall compound, roads and electrification will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.