१९ हजार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

By admin | Published: June 27, 2017 12:03 AM2017-06-27T00:03:28+5:302017-06-27T00:03:28+5:30

जिल्ह्यातील तूर खरेदीचे शासकीय केंद्र दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १० जूनपासून बंद आहे.

19 thousand farmers lost their hands | १९ हजार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

१९ हजार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

Next

दोन आठवड्यांपासून केंद्र बंद : चार लाख क्विंटल तूर घरी पडून
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील तूर खरेदीचे शासकीय केंद्र दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १० जूनपासून बंद आहे. ृटोकन दिलेल्या १९ हजार शेतकऱ्यांची चार लाख १६ हजार क्विंटल तूर खरेदी अभावी अद्याप शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. कर्ज थकीत असल्याने बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देत नाहीत. तुरीचे महिनाभरापूर्वीचे चुकारे नाहीत. शेतकरी अडचणीत असताना केंद्रांना मुदतवाढीचे आश्वासन देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
केंद्र शासनाने जिल्ह्यासह राज्यातील तूर खरेदी केंद्रांना १० जून पर्यंत १५ हजार मेट्रिक टन तूर खरेदीची परवानगी दिली होती. यामुदतीत बाजार समितीमध्ये उघड्यावरील तूर खरेदी करण्यात आली व उर्वरित शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन त्या शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. पावसाळी वातावरण असल्याने तूर ओली होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना घरीच तूर ठेवण्यास सांगण्यात आले असून त्यांना तूर खरेदीचा अनुक्रमांक आल्यानंतर बाजार समितीव्दारा फोन करण्यात येईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी निश्चिंत झाले. याकालावधीत यंत्रणेव्दारा बाजार समितीच्या मार्केट यार्डात असलेली तूर खरेदी करण्यात आली.

व्यापाऱ्यांद्वारा बेभाव खरेदी
अमरावती : टोकन दिलेल्या व शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या तुरीच्या खरेदीसाठी फोन न करताच शासकीय खरेदी केंद्रे बंद करण्यात आली. पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत असताना शासनाने फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शासनाने काही प्रमाणात कर्जमाफी केली असली तरी याविषयीचे आदेश बँकाना अद्याप प्राप्त नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ३३ हजार शेतकऱ्यांना थकीत संबोधून बँकाव्दारा कर्ज नाकारले जात आहे. मे महिन्यातील तुरीचे चुकारे अद्याप व्हायचे आहेत. अशा स्थितीत चार लाख १६ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेत व्यापारी मातीमोल भावाने तुरीची खरेदी करीत असल्याचे विदारक चित्र आहे.

खरेदी बाकी असलेल्या तुरीची स्थिती
अचलपूर तालुक्यात टोकन दिलेल्या १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती ३,६५० शेतकऱ्यांची १,०२,४६९, अंजनगाव सुर्जी २,१४० शेतकऱ्यांची ३५,६०७, चांदूरबाजार १,२३३ शेतकऱ्यांची २५,६११,चांदूररेल्वे १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२, दर्यापूर २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६, धामणगाव ३३३ शेतकऱ्यांची ११,५७३, धारणी ७४ शेतकऱ्यांची १,१६४, मोर्शी १,९१५ शेतकऱ्यांची ३४,३४५, नांदगाव खंडेश्वर १,७९२ शेतकऱ्यांची २१,१५३ व वरूड केंद्रावर २६४ शेतकऱ्यांची २,१४४ क्विंटल तूर खरेदीअभावी घरी पडून आहे.

Web Title: 19 thousand farmers lost their hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.