२ हजार ५४४ मतदारांनी दिली ‘नोटा’ला पसंती, पाेस्टल मतदानातही २७ जणांनी वापरला नोटा

By जितेंद्र दखने | Published: June 5, 2024 08:29 PM2024-06-05T20:29:30+5:302024-06-05T20:30:22+5:30

२७ अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही नाकारली उमेदवाराला पंसती

2 thousand 544 voters preferred 'NOTA', 27 people used NOTA in pastel voting too. | २ हजार ५४४ मतदारांनी दिली ‘नोटा’ला पसंती, पाेस्टल मतदानातही २७ जणांनी वापरला नोटा

२ हजार ५४४ मतदारांनी दिली ‘नोटा’ला पसंती, पाेस्टल मतदानातही २७ जणांनी वापरला नोटा

अमरावती: नोटा अर्थात ‘नन ऑफ द अबोव्ह’. एखाद्या मतदाराला निवडणूक लढवत असलेला एकही उमेदवार प्रतिनिधीत्व करण्यासाठी पात्र नाही, असे वाटत असेल, तर तो ‘नोटा’ला मतदान करतो. अमरावती मतदारसंघातील २ हजार ५४४ मतदारांनी निवडणूक रिंगणात असलेल्या ३७ उमेदवारांपैकी एकालाही मतदानासाठी आपली पसंती दिली नाही. त्यामुळे त्यांनी नोटाला मतदान करीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये काॅंग्रेसकडृून बळवंत वानखडे, भाजपच्या नवनीत राणा, प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बुब, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, बसपाचे संजयकुमार गाडगे, पिपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक इंजि. अविनाश धनवटे, अ. भा. परिवार पार्टीचे गणेश रामटेके, राष्ट्रीय ओलमा कौंसिल गाजी सादोद्दीन जहीर अहमद, नकी भारतीय एकता पार्टी दिगंबर भगत, देश जनहित पार्टी नरेंद्र कठाणे, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक भाऊराव वानखडे, बहुजन भारत पार्टी ॲड. राजू कलाने, जय विदर्भ पार्टी सुषमा अवचार,अपक्ष उमेदवारांमध्ये अनिल ठवरे ऊर्फ अनिलकुमार नाग बौद्ध, अरुण भगत, किशोर लबडे, किशोर तायडे, अनंता रामदास इंगळे, तारा वानखडे, प्रभाकर भटकर, प्रमोद चौरपगार, ॲड. पृथ्वीसम्राट दीपवंश, भरत यांगड, मनोहर कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर मानकर, रवी वानखडे, राजू सोनोने, राजेश खडे, वर्षा भगत, श्रीकृष्ण क्षीरसागर, सतीश गेडाम, सुमित्रा गायकवाड, सूरज नागदवने, सुरेश मेश्राम, सोनाली मेश्राम, संदीप मेश्राम, हिमंत ढोले आदी उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र, यातील एकही उमेदवार पसंत नसल्याचे २ हजार ५४४ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे.
विशेष म्हणजे, बडनेरा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५९९, अमरावती ४५९, तिवसा ३६६, दर्यापूर ३३०, मेळघाट ४३३, अचलपूर २८० यांप्रमाणे मतदारांनी उमेदवारांना मतदानासाठी नापसंती दर्शविली आहे.

विधानसभानिहाय ‘नोटा’ला पसंती
बडनेरा - ५९९
अमरावती - ४५९
तिवसा - ३६६
दर्यापूर - ३३०
मेळघाट - ४३३
अचलपूर - २८०
पोस्टल - २७

२७ अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही नाकारली उमेदवाराला पंसती
निवडणूक रिंगणातील उमेदवार प्रतिनिधीत्व करण्यासाठी पात्र नाही, असे अमरावती लोकसभा मतदारसंघातील २७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाटते. त्यामुळे त्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे ‘नोटा’वर मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: 2 thousand 544 voters preferred 'NOTA', 27 people used NOTA in pastel voting too.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.