२० दिवसांत ३९ जणांना डेंग्यूंचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:13 AM2021-07-28T04:13:58+5:302021-07-28T04:13:58+5:30

अमरावती : डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जुलै महिन्याच्या २० दिवसांत जिल्ह्यात डेंग्यूचे २६४ संशयित ...

In 20 days, 39 people were infected with dengue | २० दिवसांत ३९ जणांना डेंग्यूंचा डंख

२० दिवसांत ३९ जणांना डेंग्यूंचा डंख

googlenewsNext

अमरावती : डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जुलै महिन्याच्या २० दिवसांत जिल्ह्यात डेंग्यूचे २६४ संशयित रुग्णांची नोंद झाली. नंतरच्या सात दिवसांत १७३ ने वाढ झाली. यामध्ये ३९ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आल्याची जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांची माहिती आहे.

पावसाळ्याला सुरुवात होताच कीटकजन्य आजारात वाढ झालेली आहे. यात प्रामुख्याने डासांची उत्पत्ती वाढल्याने तापाचे रुग्ण वाढत आहे. यात डेंग्यूसोबत मलेरिया आणि चिकनगुनियाची रुग्णसंख्या वाढतीच आहे. २० जुलैपर्यंत महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे ७८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने प्रशासन कामाला लागले आहे. महापालिका आयुक्तांनी आरोग्य व स्वच्छता विभागाचा आढावा घेत कानपिचक्या घेतल्या.

माहितीनुसार, ज्या प्रभागात डेंग्यूचे रुग्ण आढळतील त्या प्रभागातील एसआयला नोटीस बजावली जाणार आहे. याशिवाय एएनएमच्या गृहभेटी वाढवून नागरिकांना आजारासंदर्भातील माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषद सीईओंनी याहीपुढे ज्या नागरिकांच्या घरी डेंग्यूच्या अळ्या आढळतील त्यांच्यावर कारवाईचे सुतोवाच केले आहे.

पाईंटर

डेंग्यू संशयित : २६४

पॉझिटिव्ह : ३९

मलेरिया पॉझिटिव्ह : ०७

चिकनगुनिया पॉझिटिव्ह : ०४

बॉक्स

मलेरिया, चिकगुनियाचेही रुग्ण वाढले

पावसामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने मलेरियाचीही रुग्णसंख्या वाढत आहेत. १.३६ लाख नमुन्यांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. यात जून महिन्यात सात पाॅझिटिव्हची नोंद झाली. याशिवाय डेंग्यूच्या नमुन्यांमध्येच चार रुग्ण चिकनगुनिया पाॅझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी दिली.

कोट

आरोग्य व स्वच्छता विभागाला नाल्यांच्या स्वच्छतेसोबतच कुठेही कचरा साठणार नाही. कंटेनरची तपासणी व ताप असलेल्या संशयितांचे तातडीने नमुने घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

- प्रशांत रोडे,

आयुक्त, महापालिका

Web Title: In 20 days, 39 people were infected with dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.