आरटीई प्रवेशासाठी २० दिवसांची डेडलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:14+5:302021-06-10T04:10:14+5:30
अमरावती : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवार ११ जूनपासून सुरू केली जाणार आहे. ...
अमरावती : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवार ११ जूनपासून सुरू केली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी २० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यामध्ये आरटीई लॉटरी जाहीर झाल्यानंतर लॉटरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसव्दारे मेसेज करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रवेश कधी होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी शाळांमध्ये गर्दी करू नये यासाठी आरटीई पोर्टलवरून पालकांना प्रवेश घेण्याची तारीख दिली जाणार आहे. संबंधित शाळांना तशा सूचना देण्यात आल्या असून शाळांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. आरटीई लॉटरीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. आरटीई पोर्टलवरून तारीख मिळाल्यानंतर संबंधित पालकांनी शाळेत जाऊन तात्पुरता स्वरूपाचा प्रवेश घेता येणार आहे. हा प्रवेश घेताना पालकांनी शाळेमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रती आणि छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांची पडताळणी करून जर कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या, तर तात्पुरते प्रवेश रद्द करण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
बॉक्स
प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्या सूचना
११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार
निवड यादीतील विद्यार्थ्यांना विविध दिवसाच्या प्रवेश घेणे बंधनकारक प्रवेशाची तारीख आरटीइ पोर्टल वरून कळवणार.
कागदपत्रे सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा प्रवेश दिला जाईल.
कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास प्रवेश रद्द करून पालकांना कळविण्यात येईल.
यादीतील प्रवेश दिल्यानंतर उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
बॉक्स
एकूण शाळा -२४४
एकूण जागा -२०७६
प्राप्त अर्ज संख्या -५९१८
प्रवेशास पात्र ठरलेले विद्यार्थी-१९८१
कोट
आरटी प्रवेशाची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. पालकांना संबंधित शाळेमध्ये जाऊन कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. कागदपत्रांची छाननीनंतर देण्यात आलेली तात्पुरती प्रवेश कायम करण्यात येतील.पालकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे.
- एजाज खान,
प्राथमिक शिक्षणाधिकारी