२० गांजा तस्करांची सीपीसमोर पेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:18 PM2017-08-21T22:18:05+5:302017-08-21T22:18:23+5:30
अंमली पदार्थात मोडणाºया गांजाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने गांजा विक्री करणाºया २० जणांची सोमवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर पेशी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंमली पदार्थात मोडणाºया गांजाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने गांजा विक्री करणाºया २० जणांची सोमवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर पेशी करण्यात आली. रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस आयुक्तांनी सक्त ताकिद दिली आहे. शहरात ४५ गांजा तस्कर रेकॉर्डवर असून त्यांची पेशी सीपीसमोर करण्यात येणार आहे.
शहरात गांजाची छुप्या मार्गाने विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. सोमवारी गुन्हे शाखेच्या पथकाने शे. सत्तार शे. अजीज, शे. अन्वर शे. मुजीर, शे. रहिम शे. रसूल, संजय सोमाने, विजय सूर्यभान किर्तक, प्यारे खां रहेमान खां, अ. गणी अ. समज, शे. वसिम शे. मेहबूब, मोहम्मद तौसिफ मो. रफिक, सैयद बिल्किस बी शे. रफिक, संजय खांडे, मालन बब्बू लुचईवाले व इब्राहिम बब्बू लुचईवाले अशा तेरा जणांना ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या समक्ष पेशी केली. सीपींनी गांजा विक्रेत्यांना सक्त ताकिद दिली आहे. गुन्हे शाखेचे पीएसआय राम गिते यांच्या मार्गदर्शनात आरोपींना ताब्यात घेण्यात आले.