२० लाखांचा पान मसाला,सुगंधित सिगारेटचा माल कुणाचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:42 PM2018-01-28T22:42:07+5:302018-01-28T22:43:40+5:30
दर्यापूर पोलिसांनी अंजनगाव-अकोट मार्गावर टी-पॉइंटजवळ मध्यप्रदेशातून वाहतूक करणाºया ट्रकसह २० लाख ६ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : दर्यापूर पोलिसांनी अंजनगाव-अकोट मार्गावर टी-पॉइंटजवळ मध्यप्रदेशातून वाहतूक करणाºया ट्रकसह २० लाख ६ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला. पण, हा माल कुणाचा, याचा तपास चार दिवस होऊनही अन्न व औषध प्रशासनाला अद्याप लागलेला नाही.
ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी गोपनीय माहितीवरून लाखो रुपयांचा पानमसाला मिश्रित गुटखा व सुगंधित सिगारेटचा माल जप्त केला. पण, पोलिसांना अवैध वाहतूक करणाºया ट्रकमालक-चालक तसेच व्यापारी यांच्यावर कारवाईचे आदेश नसल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने माल ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. परंतु, या घटनेला चार दिवस होऊनही ही खेप कोणाकडे जात होती, याचा तपास अद्यापपर्यंत लागलेला नाही. तथापि, मूर्तिजापूर येथील अग्रवाल व अकोला जिल्ह्यामधील गुटखा व्यापारी कालू यांची चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे तपास अधिकारी कार्यवाहीचा वेग वाढवणार का, हा प्रश्न याप्रकरणी उपस्थित केला जाऊ लागला आहे.
बिल्टी १८ हजारांची, माल लाखोंचा
ट्रकमध्ये असलेल्या सुगंधित सिगारेटच्या एक बॉक्सची किंमत १८ हजार रुपये ट्रान्सपोर्ट बिल्टीवर टाकण्यात आली आहे. पण, त्या एका बॉक्सची किंमत लाखोंच्या घरात आहे. अशाप्रकारे वाहतूक केल्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.
गुटखा व्यापाऱ्याने दिली टीप!
जिल्ह्यामध्ये गुटखा व्यापारी असलेला किंगमेकर यांनीच पोलिसांना मध्यप्रदेशमार्गे येणाºया ट्रकची टीप दिल्याची चर्चा पोलीस विभागामध्ये रंगत आहे.
अजूनपर्यंत कोणाचा माल होता व तो कुठे जात होता, या सर्व गोष्टी तपासायला वेळ लागणार आहे.
- विश्वजित शिंदे,
अन्न व औषध प्रशासन विभाग, अमरावती