५०० मीटरसाठी २० किलोमीटरचा वळसा !

By admin | Published: April 18, 2016 12:02 AM2016-04-18T00:02:40+5:302016-04-18T00:02:40+5:30

जिल्हा स्त्री रुग्णालयातील दोन महिलांना इर्विनमध्ये हलविण्यासाठी चक्क २० किलोमीटर अंतरावरील भातकुलीवरून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलविण्यात आली.

20-meter road for 500 meters! | ५०० मीटरसाठी २० किलोमीटरचा वळसा !

५०० मीटरसाठी २० किलोमीटरचा वळसा !

Next

भातकुलीहून आली ‘१०८’ : डफरीन ते इर्विन रूग्ण ‘रेफर’
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील दोन महिलांना इर्विनमध्ये हलविण्यासाठी चक्क २० किलोमीटर अंतरावरील भातकुलीवरून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलविण्यात आली. हा प्रकार रविवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडला. यावरून या रुग्णवाहिकांचा दुरुपयोग होत असल्याचे आढळून येत आहे. असल्या प्रकारामुळे शासनाला लाखोंचा फटका बसत आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयातील दोन महिलांची प्रकृती रविवारी दुपारी ११.४५ वाजताच्या दरम्यान अचानक बिघडली. त्यामुळे तेथील डॉक्टर व परिचारिकांनी १०८ क्रमांकाला कॉल करून रुग्णवाहिका पाठविण्यास सांगितले. १०८ क्रमांकाच्या कॉल सेन्टरला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ अमरावतीमधील केंद्राला कळविले. डफरीन रूग्णालयानजीक असणारी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका तत्काळ डफरीन रुग्णालयात पाठवा, असे कॉल सेन्टरवरून रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याला सांगण्यात आले. मात्र, डफरीनजवळ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे कॉलसेन्टरवरून भातकुली पीएचसीतील रूग्णवाहिका बोलाविण्यात आली. अवघ्या पाचशे मिटर अंतरावरील रुग्णालयात जाण्यासाठी २० किलोमिटरवरून रुग्णवाहिका बोलविण्याचा हा प्रकार शासननिधीचा गैरवापर आहे. रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास १०८ क्रमांकाची एम.एच. ४-सी.एल.-०५६५ ही रूग्णवाहिका इर्विन रुग्णालयाच्या आवारात उभी होती.

शासनाच्या रुग्णवाहिकेचा वापर घटला
अमरावती : या रुग्णवाहिकेद्वारे डफरीनमधील दोन रुग्णांना इर्विनमध्ये आणले गेले. शासनाने रुग्णांना ने-आण करण्यासाठी बहुंताश रुग्णालयांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहे. इर्विन व डफरीनमध्येही रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र, जेव्हापासून १०८ रुग्णवाहिका कार्यान्वित झाल्यात, तेव्हापासून जुन्या रुग्णवाहिकांचा वापर कमी केल्या जात आहे. आपातकालिन स्थितीत रुग्णांना आरोग्य सेवा देणारी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका आहे. मात्र, अनेकदा किरकोळ रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिकेचा वापर केला जातो. डफरीनमधून इर्विनमध्ये रुग्ण रेफर केला जातो आणि त्यासाठी भातकुलीवरून रुग्णवाहिका बोलाविण्यात येते हा प्रकार शासनाला चुना लावणाराच आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक वारे यांच्याशी सपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)

भाजलेल्या रुग्णाला करावी लागली प्रतीक्षा
भातकुलीवरून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका डफरीनमध्ये बोलाविण्यात आल्याने सायत गावातील एका भाजलेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेची प्रतिक्षा करावी लागली. भातकुली पीएससीमधील ही १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका अमरावतीत आल्याने सायत रुग्णाला ताटकळत राहावे लागल्याची माहिती रुग्णवाहितील संबधीत कर्मचाऱ्यांने दिली. असे प्रकार घडत असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.

Web Title: 20-meter road for 500 meters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.