३९ ग्रामपंचायतींसाठी २० अधिकारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:11 AM2020-12-25T04:11:49+5:302020-12-25T04:11:49+5:30

पाळा, दापोरी, मायवाडी भाईपूर, यावली या ग्रामपंचायतीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनोद उंद्रे व एआरओ म्हणून ...

20 officers appointed for 39 Gram Panchayats | ३९ ग्रामपंचायतींसाठी २० अधिकारी नियुक्त

३९ ग्रामपंचायतींसाठी २० अधिकारी नियुक्त

Next

पाळा, दापोरी, मायवाडी भाईपूर, यावली या ग्रामपंचायतीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनोद उंद्रे व एआरओ म्हणून राजकुमार इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अडगाव, विचोरी, रोहनखेड, काटसूर या ग्रामपंचायतींसाठी आरओ म्हणून अनिल खेरडे, तर एआरओ म्हणून सतीश उबाळे, तर दाभेरी, काटपूर, पोरगव्हाण या ग्रामपंचायतीकरिता एन.एम .साहूरकर व चंद्रशेखर आगरकर, कोळविहीर, आष्टोली, तरोडा, खेड या ग्रामपंचायतींकरिता नंदकिशोर देशमुख, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्यामकांत भोपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्यात सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नेरपिंगळाई व सावरखेड या गावांकरिता युवराज वाघमारे व प्रल्हाद दाभोळे, वऱ्हा, खोपडा, उदखेड, लाडकी बुद्रुक या ग्रामपंचायतीकरिता नितीन सुपले व राजेंद्र भोजने, येरला, नशीदपूर, सिंभोरा, पार्डी या ग्रामपंचायतींकरिता विनोद वानखडे व अशोक देशमुख, अंबाडा, खानापूर, चिखलसावंगी, चिंचोली गवळी या ग्रामपंचायतींकरिता रामेश्वर मायंदे व गोपाल वाघमारे, निंभी, शिरखेड, नया वाठोडा, लिहिदा ग्रामपंचायतीकरिता समीर वडनेरकर व एस.एन. गेडाम, तर राजुरवाडी, कवठाळ, येवती, शिरूर या ग्रामपंचायतींकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाय.एस. गिरीपुंजे, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रोशन गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

------------

Web Title: 20 officers appointed for 39 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.