वऱ्हाडातील केवळ २० तालुक्यांत पावसाचे शतक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 07:42 PM2019-09-23T19:42:08+5:302019-09-23T19:42:19+5:30

यवतमाळ, वाशीम माघारले : अमरावती, अकोल्याने गाठली सरासरी

20 talukas in Varhad has a century of rainfall | वऱ्हाडातील केवळ २० तालुक्यांत पावसाचे शतक 

वऱ्हाडातील केवळ २० तालुक्यांत पावसाचे शतक 

Next

- प्रदीप भाकरे
अमरावती : पावसाचा उणापुरा एक आठवडा शिल्लक असताना पश्चिम विदर्भातील केवळ २० तालुक्यांनी सरासरी गाठली आहे. उर्वरित तालुके ५० ते ९० टक्क्यांच्या आसपास आहेत. त्यातही यवतमाळ आणि वाशीम या दोन जिल्ह्यांत सरासरी ६० टक्के पाऊस झाला. आता आठवडाभरात ४० टक्के तूट भरून निघणारी नाही.


पावसाळ्याच्या १ जून ते २३ सप्टेंबर या कालावधीत अमरावती जिल्ह्यात १०५.५ टक्के, अकोला जिल्ह्यात ११५.१ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात नीचांकी ५९.८ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात १००.४ टक्के व वाशीम जिल्ह्यात ७१.४ असा सरासरी ९०.४ टक्के पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाच्या ११३ दिवसांमध्ये अमरावतीत १००.३, अकोल्यात १०९.४, यवतमाळमध्ये ५६.९, बुलडाण्यात ९५.२ व वाशिम जिल्ह्यामध्ये ६७.९ टक्के असा सरासरी ८५.९ टक्के पाऊस पडला. पावसाळ्याचा एक आठवडा शिल्लक असताना ही विभागाची सरासरी तूट १४ टक्के असली तरी यवतमाळ जिल्ह्यात ती तूट सर्वाधिक ४३ टक्के अशी उच्चांकी आहे. सोबतच वाशिम जिल्ह्यातही ३२ टक्के पाऊस कमी पडल्याची यंदाची नोंद आहे.


पावसाच्या ११३ दिवसांची आकडेवारी बघितल्यास अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, धारणी व चिखलदरा या सात तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात सरासरीपेक्षा ४५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर व पातूर या पाच तालुक्यांनी पावसाचे शतक गाठले. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यात बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात आतापर्यंत ६६.४, माळेगावमध्ये ७३, रिसोडमध्ये ८३.५, मंगरुळपीरमध्ये ७४.९, मानोºयात ६०.५ व कारंजा तालुक्यात ७१.३ टक्के पावसाची नोंद झाली. 

यवतमाळ जिल्हा सरासरी ६० टक्के
यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी आर्णी तालुक्यात ७९.६ टक्के असा उच्चांकी पाऊस नोंदविला गेला. १६ पैकी एकाही तालुक्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत पुरेपूर पाऊस पडला नाही. पावसाचा केवळ आठवडा शिल्लक असताना यवतमाळ तालुक्यात केवळ ४२ टक्केच पाऊस पडला. कळंब, दारव्हा, केळापूर, घाटंजी, राळेगाव, झरी जामणी या तालुक्यांत पाऊस ५२ टक्क्यांवर स्थिरावला. १२० दिवसांच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४३ टक्के तूट नोंदविली गेली. गतवर्षीही यवतमाळ जिल्ह्यावरच पाऊस रुसला होता. सलग दुसºया वर्षी यवतमाळात पावसाची तूट नोंदविली गेली.

Web Title: 20 talukas in Varhad has a century of rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.