नियमभंग करणाऱ्यांवर २० पथकांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:17+5:302021-03-07T04:13:17+5:30

अमरावती : जिल्हा अनलॉक केल्यानंतर कोरोना प्रतिबंधासाठी दुकानदार व नागरिकांकडून नियमांचे पालन होणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमभंग ...

20 teams keep a close eye on violators | नियमभंग करणाऱ्यांवर २० पथकांची करडी नजर

नियमभंग करणाऱ्यांवर २० पथकांची करडी नजर

Next

अमरावती : जिल्हा अनलॉक केल्यानंतर कोरोना प्रतिबंधासाठी दुकानदार व नागरिकांकडून नियमांचे पालन होणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी शहरात परिसरनिहाय २० विशेष पथके नियुक्त केली आहेत. त्यात चार उपजिल्हाधिकाऱ्यांना पाच पथकांना एक याप्रमाणे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

पथकांकडून सार्वजनिक स्थळी थुंकणारा प्रथम आढळल्यास पाचशे रुपये दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. चेहऱ्यावर मास्क न लावल्यास पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. दुकानदार, भाजी विक्रेते यांनी दोन ग्राहकांमध्ये तीन फूट अंतर, मार्किंग न करणे आढळल्यास दुकानदाराला आठ हजार दंड व फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्या ग्राहकाकडूनही ३०० रुपये दंड आकारण्यात येईल. किराणा दुकानदाराने वस्तूंचे दरपत्रक लावले नसल्याचे आढळल्यास तीन हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. या सर्व कृती दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

बॉक्स

कॉटन मार्केट, मोची गल्ली, भाजी बाजार

उपजिल्हाधिकारी रणजित भोसले यांच्याकडे नियंत्रण अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. गाडगेबाबा मंदिर रस्ता परिसरासाठी तहसीलदार प्रज्ञा महांडुळे, भाजी बाजारासाठी सहायक कामगार आयुक्त अनिल कुटे, मोची गल्ली परिसरासाठी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, कॉटन मार्केटसाठी सहायक समाजकल्याण उपायुक्त मंगला मून यांची नेमणूक आहे.

बॉक्स

रुक्मिणीनगर, इतवारा, जवाहर गेट

उपजिल्हाधिकारी वर्षा पवार या नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी पाहतील. दस्तुरनगरसाठी रोजगार सहायक संचालक प्रफुल्ल शेळके, रुक्मिणीनगरसाठी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र गुठळे, इतवारा बाजारासाठी जलसंधारणाचे महेश निपाणे, जवाहर गेट ते सराफा लाईनसाठी उद्योग निरीक्षक जी.बी. सांगळे,, गुलशन मार्केट परिसरासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांची नेमणूक आहे.

बॉक्स

मालटेकडी, नवाथे चौक आदी परिसर

उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्याकडे नियंत्रण अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. रविनगरसाठी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, गांधी चौकासाठी उद्योग निरीक्षक ए. एन. इंगळे, मालटेकडी परिसरासाठी सहायक नगररचनाकार श्रीकांत पेटकर, नवाथे चौकासाठी पाटबंधारे अभियंता ज. श. दारोडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

जयस्तंभ, राजकमल, इर्विन चौक

उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत हे नियंत्रण अधिकारी आहेत. त्याअंतर्गत जयस्तंभ चौकासाठी नगररचनाकार रणजितसिंह तनपुरे, , राजकमल चौकासाठी जीएसटी निरीक्षक सागर मोटघरे, इर्विन चौकासाठी जीएसटी निरीक्षक रीतेश पिल्ले, मालटेकडी परिसरासाठी जीएसटी निरीक्षक राजेश राऊत, पंचवटी चौकासाठी जीएसटी निरीक्षक ........................ यांचा पथकात समावेश आहे.

Web Title: 20 teams keep a close eye on violators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.