जिल्ह्यात २० हजार कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:12 PM2018-03-10T22:12:38+5:302018-03-10T22:12:38+5:30
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला व जिल्ह्याला भरभरून निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विविध योजनांमधून २० हजार ५०० कोटी रुपयांची कामे करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला व जिल्ह्याला भरभरून निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विविध योजनांमधून २० हजार ५०० कोटी रुपयांची कामे करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
येथील नागपुरी गेट चौकातील आयोजित कार्यक्रमाते ते बोलत होते. पालकमंत्री व आ.सुनील देशमुख यांच्या प्रयत्नाने चित्रा चौक ते नागपुरी गेट चौकापर्यंत होणाºया उड्डाणपूल व जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या २०० खाटांच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सुनील देशमुख होते. यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खा. आनंदराव अङसूळ, आ. रवि राणा, आ. अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, मिलिंद चिमोटे, शेख जफर, शंकरराव हिंगासपुरे, सुरेखा लुंगारे, प्रभारी मुख्य अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे, उपअभियंता आशुतोष शिरभाते, सीएस श्यामसुंदर निकम, शोएब खान, नझीर खान बी.के., नूर खान आदी उपस्थित होते. आ.देशमुख यांनीही विकासकामांचा पाढा वाचला. संचालन सचिन चौधरी व आभार प्रदर्शन मिलिंद पाटणकर यांनी केले.