२० हजारांच्या लाचप्रकरणी औषधी सह आयुक्तांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 09:28 PM2019-09-19T21:28:13+5:302019-09-19T21:34:35+5:30
मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाकडून २० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी औषधी सह आयुक्तांना एसीबीच्या पथकाने सापळा रचून गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे.
अमरावती: मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाकडून २० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी औषधी सह आयुक्तांना एसीबीच्या पथकाने सापळा रचून गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे.
तक्रारदाराचे मेडिकल स्टोअर असून औषधी सह आयुक्तांनी तक्रारदाराच्या मेडिकलमधून यापूर्वी घेतलेल्या नमुन्यांपैकी काही नमुन्यांच्या नकारात्मक तपासणी अहवालावरून तक्रारदाराविरुद्ध कुठलीही कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच व एका कंपनीचे दोन पावडरच्या डब्यांची लाचेची मागणी केली होती. यापूर्वी १८ हजारांची लाच स्वीकारली. उर्वरित दोन हजारांची लाच व एक पावडरचा डबा स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या सह आयुक्ताला त्याच्या दालनात अटक करण्यात आली.
प्रभारी सहायक आयुक्त आणि औषधी निरीक्षक अन्न व औषधी प्रशासन विभाग अमरावती येथे कार्यरत चिंतामण कानुजी डांगे (४९) असे आरोपीचे नाव आहे. त्याला एसीबीच्या पथकाने गुरुवारी अटक केली. ३७ वर्षीय औषधे व्यवसायिकांना आरोपीने २० हजार रुपये व दोन पावडरच्या डब्याची लाच मागणी केली होती. यापैकी १८ हजार रुपये व एक पावडरचा डबा लाच म्हणून आरोपीने यापूर्वीच स्वीकारली. याची पडताळणी एसीबीने केल्यानंतर सापळा कारवाई दरम्यान दोन हजार रुपये व २६० रुपये किमतीचा पावडरचा डबा आरोपीने स्वीकारताना एसीबीनेत्याला रंगेहात पकडले.
दरम्यान या कारवाईमुळे एफडीएमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच ही कारवाई खुद्द आरोपीच्या कार्यालयातील दालनात करण्यात आली असून यासंदर्भाचा गुन्हा कोतवाली ठाण्यात नोंदविण्यात आला. ही करवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, चंद्रशेखर दहेकर, सुनील वºहाडे, अभय वाघ, महेंद्र साखरे, चंद्रकांत जनबंधू आदींच्या पथकाने केली.