म्हैसपूर येथे २०० नागरिकांनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:00+5:302021-04-16T04:13:00+5:30
वाठोडा शुक्लेश्वर : नजीकच्या म्हैसपूर येथे वाठोडा आरोग्य उपकेंद्रांतर्गत ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाली. गुरुवारी पहिल्याच दिवशी ...
वाठोडा शुक्लेश्वर : नजीकच्या म्हैसपूर येथे वाठोडा आरोग्य उपकेंद्रांतर्गत ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाली. गुरुवारी पहिल्याच दिवशी २०० ग्रामस्थांनी लस टोचून घेतली. यामध्ये परिसरातील तीन गावांतील ग्रामस्थांचा समावेश होता.
वाठोडा शुक्लेश्वर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत येत असलेल्या म्हैसपूर, बुधागड, बोरखडी या गावांचा समावेश आहे. नागरिकांनी लस घेतल्यानंतर दोन दिवसांच्या निशुःल्क औषधी देण्यात येत आहे. लसीकरण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच निलकंठ पाटील, पोलीस पाटील शिवानंद पाटील, उपसरपंच वसंत ढोके, ग्रामपंचायत सदस्य अजय साखरे, वैशाली ढोके,भारती गायकवाड, रेखा ढोरे, शीतल ठाकरे, जानराव गायकवाड, साहेबराव गायकवाड,अण्णासाहेब ढोके, राजू ढोके, शंकर तानोडाकर, तलाठी धर्मासरे, निवृत्ती साखरे, ज्ञानेश्वर साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती रिपुरकर, डॉ. अक्षय निकोसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश पारडे, आरोग्य सेवक रामेश्वर अंभोरे, उमाकांत माकावर, आरोग्यसेविका घाटोळ यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या.