राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:27 PM2018-07-23T23:27:27+5:302018-07-23T23:27:47+5:30

शेतमालाला योग्य भाव आणि कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने तिवसा येथे करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी सोमवारी तिवसा तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुनावणी होऊन आ. रवि राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ करण्यात आला. शेतकरीहिताच्या या निर्णयासाठी शेतकऱ्यांनी न्यायाधीशांचे आभार व्यक्त केले. आ. रवि राणा व आंदोलक शेतकऱ्यांची बाजू अ‍ॅड. दीप मिश्रा, अ‍ॅड. आशिष लांडे यांनी मांडली.

200 protesters along with Rana farmers waived penalties | राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ

राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ

Next
ठळक मुद्देतिवसा येथे झाले होते आंदोलन : शेतकरीहिताच्या निर्णयासाठी न्यायाधीशांचे मानलेआभार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतमालाला योग्य भाव आणि कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने तिवसा येथे करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी सोमवारी तिवसा तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुनावणी होऊन आ. रवि राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ करण्यात आला. शेतकरीहिताच्या या निर्णयासाठी शेतकऱ्यांनी न्यायाधीशांचे आभार व्यक्त केले. आ. रवि राणा व आंदोलक शेतकऱ्यांची बाजू अ‍ॅड. दीप मिश्रा, अ‍ॅड. आशिष लांडे यांनी मांडली.
सन २०१२ मध्ये आ. रवि राणा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावाकरिता तसेच सरसकट कर्जमाफीकरिता तिवसा येथे रास्ता रोको केले होते. यावेळी अन्नत्याग करून २०० आंदोलक शेतकऱ्यांनी जेल भरो आंदोलन केले होते. तब्बल नऊ दिवस आमदार रवि राणासह २०० शेतकºयांना याकरिता जेलवारी करावी लागली होती.
गोरगरीब शेतमजुरांकडून दंडाची रक्कम घेऊ नये, याकरिता पुन्हा आ. रवि राणा यांनी विरोध केल्याने त्यांना दोन दिवस तुरुंगात राहावे लागले होते. या आंदोलनाचे पडसाद जिल्हाभर उमटून शेतकºयांच्या तीव्र भावना व्यक्त झाल्या होत्या.
शेतकरीहिताचा निर्णय देणाºया न्यायाधीशांचे आंदोलक शेतकºयांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी आ. रवि राणा यांच्यासह रमेश कांडलकर (रा. वरखेड), संजय पनपालिया (रा. धामणगाव), संदेश मेश्राम (रा. पालवाडी), राजेंद्र जाधव (रा. तळेगाव ठाकूर), किरण खंडारे (रा. गुरुदेवनगर), राधे धिगवानी, पराग चिमोटे, दिलीप पोटफोडे (रा. अनंतानगर, आर्वी), धीरज केने (रा. वरखेड), रंजित देऊळकर (रा. तिवसा), वैभव ठाकूर (रा. तळेगाव), रोहित वैद्य, प्रदीप अलोने (रा. राजुरवाडी), राजेंद्र खडसे (रा.तारखेड), प्रफुल्ल गडलिंग (रा. वरखेड), सुधीर डेहणकर (रा. तळेगाव ठाकूर), मिलिंद खाकसे (रा. आखदवाडा), प्रकाश खडसे (रा. धामंत्री), जीवन गवई (रा. वरखेड), गजानन अवंतकर (रा. तळेगाव ठाकुर), अशोक परतेकी (रा. आर्वी), प्रवीण वानखडे, मोहन बारबैल, शेख चाँद शेख हनीफ, सुरेश गभणे, राजेंद्र मनोहरे (रा.वरखेड), सुखदेव गावंडे (रा. मोझरी), गजानन आगलावे, अविनाश बेलेकर, रोशन लवटेसह आंदोलक शेतकºयांची उपस्थिती होती.

Web Title: 200 protesters along with Rana farmers waived penalties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.