२०२० मध्ये ८८ हजार नागरिकांनी मोडले वाहतुकीचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:53+5:302021-01-02T04:11:53+5:30

संदीप मानकर : अमरावती कोरोनामुळे गाजलेल्या २०२० या वर्षभरात ८७ हजार ९०१ नागरिकांनी वाहतुकीचे नियम मोडले. त्यांच्याकडून वाहतूक पोलिसांनी ...

In 2020, 88,000 citizens broke traffic rules | २०२० मध्ये ८८ हजार नागरिकांनी मोडले वाहतुकीचे नियम

२०२० मध्ये ८८ हजार नागरिकांनी मोडले वाहतुकीचे नियम

Next

संदीप मानकर : अमरावती

कोरोनामुळे गाजलेल्या २०२० या वर्षभरात ८७ हजार ९०१ नागरिकांनी वाहतुकीचे नियम मोडले. त्यांच्याकडून वाहतूक पोलिसांनी १ कोटी ११ लाख ६१ हजार ८५० रुपये तडजोड शुल्क वसूल

केले आहे.२०१९ मध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान ४६,०३३ नागरिकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ९८ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा तडजोड शुल्क (दंड) वसूल केला होता. २०१९ वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये वाहतूक नियम मोडल्याची ४१,८६८ प्रकरणे अधिक नोंदविली गेली. १२ लाख ७५ हजार ४५० रुपये तडजोड शुल्कही अधिक वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभारी सहायक पोलीस आयुक्त ( वाहतूक) राहुल आठवले यांनी दिली.

शहरातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसावा, याकरिता पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी फॅन्सी नंबर प्लॅट तसेच नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई मोहीम राबविण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले होते. याशिवाय ड्रंक अँड डाईव्हची प्रकरणे सर्वाधिक होती. वाहतूक शाखा पूर्व, पश्चिम विभागात प्रभारी एसीपी राहुल आठवले , पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्यासह वाहतूक पथकाने ही कामगिरी बजावली आहे.

पोलिसांत दाखल प्रकरणे (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२०)

ड्रंक अँड डाईव्ह - ६४

अवैध प्रवासी वाहतूक-८९

भरधाव वेगाने वाहन चालविणे - ४८३१

विनापरवाना वाहन चालविणे -९७३

सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करणे -२४३५

नो-पार्किंग - ९३९६

फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर वाहने - १५१९

प्रवेशबंदी उल्लंघन - १५१९

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - २९७३

ट्रिपलसीट -३०६८

परवाना निलंबन प्रस्ताव - १०४०

कोट

पोलीस आयुक्तांनी आदेश दिल्यानुसार यंदा वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून नियमांप्रमाणे तडजोड शुल्क वसूल केले. नववर्षात अपघात टाळण्याकरीता सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.

राहुल आठवले, प्रभारी सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक)

Web Title: In 2020, 88,000 citizens broke traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.