चांदसुरा येथे २१ जनावरांचा आगीत मृत्यू
By admin | Published: April 24, 2016 12:19 AM2016-04-24T00:19:00+5:302016-04-24T00:19:00+5:30
अडाणेश्वर देवस्थानच्या चांदसुरा येथील गोरक्षणला शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने आगीत २० जनावरांचा जळून मृत्यू झाला.
नांदगाव खंडेश्वर : अडाणेश्वर देवस्थानच्या चांदसुरा येथील गोरक्षणला शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने आगीत २० जनावरांचा जळून मृत्यू झाला.
या आगीत गोरक्षणच्या तीन खोल्या, गुरांचा गोठा, तूर व सोयाबिनचे कुटार शेणखताचा ढिगारा व स्प्रिंकलरचे पाईप आगीत भस्मसात झाले. गोरक्षणामध्ये सुमारे २२५ जनावरे आहे. आग लागल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी जनावरे गोरक्षणमधून बाहेर काढली. यामध्ये १५ लहान वासरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तसेच तीन म्हशी व दोन गायींचा आगीत मृत्यू झाला. हे गोरक्षण चांदसुरापासून दिड किमी अंतरावर आहे. आगीची माहिती नागरिकांना कळताच याची माहिती अमरावती व चांदूररेल्वे येथील अग्निशमन पथकाला देण्यात आली. अग्निशमन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर बराचवेळानंतर ही आग आटोक्यात आली.
तोपर्यंत राखरांगोळी झाली होती. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वाहुरवाघ, नायब तहसीलदार पिसाळे, पशुवैद्यकीय अधिकारी गोऱ्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. (तालुका प्रतिनिधी)
दोन लाखांचा मुद्देमाल लंपास
अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दोन घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. चोरट्यांनी तब्बल १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पदमसौरभ कॉलनीतील रहिवासी महिला फ्लॅटला कुलूप लावून नोकरीवर गेल्या होत्या.
दरम्यान अज्ञात चोराने त्यांच्या फ्लॅटचे दार तोडून आत प्रवेश केला. चोराने घरातील सोन्या ऐवज व रोख असा एकूण १५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.