‘त्या’ ठरावावर २१ नगरसेवकांनी नोंदविली हरकत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:39+5:302021-07-03T04:09:39+5:30

वाद चव्हाट्यावर: सत्ताधारी विरोधक आमनेसामने वरूड : शहरालगतच्या शेतजमिनीचा निवासी क्षेत्रात समावेश करावा, याकरिता १० लोकांनी ...

21 corporators object to 'that' resolution! | ‘त्या’ ठरावावर २१ नगरसेवकांनी नोंदविली हरकत !

‘त्या’ ठरावावर २१ नगरसेवकांनी नोंदविली हरकत !

Next

वाद चव्हाट्यावर: सत्ताधारी विरोधक आमनेसामने

वरूड : शहरालगतच्या शेतजमिनीचा निवासी क्षेत्रात समावेश करावा, याकरिता १० लोकांनी सामायिक अर्ज केला. त्यावर चर्चेकरिता २१ जून रोजी सर्वसाधारण सभा पार पडली. यात सत्ताधारी वगळता २१ विरोधकांनी ठरावाला मंजुरी दिली. यावर विरोधक सूचक आणि अनुमोदक आहे, हे विशेष. आता त्याच २१ विरोधकांनी त्या ठरावावर हरकत नोंदविली आहे.

नगराध्यक्षांच्या पतीला लाभ मिळवून देण्याकरिता हा ठराव घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे विरोधकांनी घुमजाव करून ‘ते आम्ही नाहीच’ अशी भूमिका घेऊन तो ठराव क्रमांक १९ रद्द करण्याकरिता हरकत नोंदविली आहे. नगराध्यक्षांचे पती म्हणतात, मी अर्जच केला नाही तरी माझ्या शेताचा ठराव झाला कसा? यामुळे नगरपरिषदेत पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. ठरावाचे वाचन करून त्यावर अनुमोदक आणि सूचक हे विरोधक असताना २१ नगरसेवकांनी मंजुरी दिली. खुद्द नगराध्यक्षांचे पतीच्या मालकीची शेतजमिनीचा उल्लेख यात आल्याने चर्चेला पेव फुटले. याबाबत शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख किशोर माहोरे यांनी पत्रपरिषदेत नगर परिषदेतील सावळागोंधळाची आणि नगराध्यक्षांचे पतीला होणाऱ्या लाभाबद्दल वाच्यता केली असता, सत्ताधारी, विरोधकांचे धाबे दणाणले.

विरोधक म्हणतात, आम्हाला माहिती नाही

सदर ठराव कशाचा आहे, हे आम्हाला माहिती नसल्याने आम्ही ठरावाच्या बाजूने स्वाक्षरी केली नाही, असे विरोधक ठामपणे सांगत आहेत. याबाबत हरकत नोंदवून ठराव क्र. १९ नामंजूर करण्याची विनंती केली आहे. परंतु नगरसेवकांना नागरिकांनी विश्वासाने निवडून देऊन पालिकेत पाठविले. खाबुगिरीत शहरवासीयांची दिशाभूल सुरु असल्याने राजकीय क्षेत्रात खमंग चर्चा सुरू आहे.

Web Title: 21 corporators object to 'that' resolution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.