२१ मांस विक्रेत्यांवर होणार फौजदारी

By admin | Published: April 3, 2015 12:06 AM2015-04-03T00:06:09+5:302015-04-03T00:06:09+5:30

जगाला शांती, अहिंसा आणि दयेचा मार्ग दाखविणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंती दिनी शासनाने कत्तलखाने,

21 foreclosures will be on meat sellers | २१ मांस विक्रेत्यांवर होणार फौजदारी

२१ मांस विक्रेत्यांवर होणार फौजदारी

Next

महापालिका आयुक्तांचे आदेश : महावीर जयंतीदिनी दुकाने सुरु
अमरावती
: जगाला शांती, अहिंसा आणि दयेचा मार्ग दाखविणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंती दिनी शासनाने कत्तलखाने, मांस विक्री दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शहरातील विविध भागात २१ दुकानांमध्ये गुरुवारी मांस विक्री करीत असताना महापालिका चमूने कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्यामुळे या सर्व मांस विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली जाणार आहे. राज्य शासनाने महावीर जयंती दिनी कत्तलखाने, मांस विक्री दुकाने बंद करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविली होती. मांस विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवण्याबाबत बुधवारी नोटीस बजावली असताना देखील शहरात इतवारा बाजारासह काही भागात मोठ्या प्रमाणात मांस विक्री सुरुच होती.

धारणीतही मांसविक्री
धारणी : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीरांच्या जयंतीदिनी कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, गुरूवारी या आदेशांचे शहरात उल्लंघन झाल्याचे चित्र होते. सर्रास मांसविक्री सुरू होती. शहरात गुरूवारी शेकडोंच्या संख्यने मूक प्राण्यांची हत्या करण्यात आली.
भगवान महावीरांनी भुतदयेचा संदेश दिला. अहिंसेवर त्यांचा भर होता. त्यामुळेच त्यांची जयंती साजरी करताना मांसविक्री बंद ठेवण्याचा अध्यादेश राज्य शासनाच्या पत्र क्र. संकीर्ण १०/२००२ प्र.क्र.१११/नावि. २७ नगरविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांनी २८ मार्च २००३ रोजी जारी केला आहे. या दिवशी कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या पत्राच्या प्रती स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठविण्यात आल्या आहेत. तरीही धारणीत खुलेआम मांस विक्री सुरू होती.

महावीर जयंती दिनी मांस विक्री होता कामा नये, असे आदेश बजावले होते. तरिदेखील काही भागात मांस विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सुरु असलेली दुकाने तात्काळ बंद करुन अहिंसा दिन पाळण्याचे पशुशल्य चिकित्सकांना कळविले. ज्या विक्रेत्यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही, अशांवर फौजदारी दाखल केली जाणार आहे.
- अरुण डोंगरे
आयुक्त, महापालिका.

हे प्रकरण नगर विकासाशी संबंधित असल्याने या प्रकरणात कारवाई करण्याची जबाबदारी धारणी ग्रामपंचायतीची होती. पोलीस यात हस्तक्षेप करू शकत नाहीत.
अरविंद राऊत
पीएसआय, धारणी

आज सुटी असल्याने मी ग्रामपंचायत कार्यालयात गेलो नाही. मांसविक्रीबाबतच्या शासकीय अध्यादेशाबद्दल काहीही माहिती नाही.
राजेश पटेल
सरपंच, धारणी

Web Title: 21 foreclosures will be on meat sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.