कापूसतळणीत २१ वर्षांची युवती सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:21 AM2021-02-18T04:21:36+5:302021-02-18T04:21:36+5:30
वनोजा बाग : कापूसतळणी येथील अक्षता खडसे ही २१ वर्षे ४ महिने वयाची तरुणी गावकारभारी झाली आहे. अंजनगाव सुर्जी ...
वनोजा बाग : कापूसतळणी येथील अक्षता खडसे ही २१ वर्षे ४ महिने वयाची तरुणी गावकारभारी झाली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्वाधिक १७ सदस्यसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतीची सरपंच ही तरुणी झाली आहे.
कापूसतळणी येथे १५ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत निवडणूक झाली. यामध्ये ९ विरुद्ध ८ मतांनी अक्षता खडसे यांनी सरपंचपदावर बाजी मारली. उपसरपंचपदी शांताबाई अभ्यंकर यांची वर्णी लागली. येथे काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, अक्षता खडसे यांनी नुकतेच ..................... शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कुटुंबात राजकारणाची पार्श्वभूमी नाही. मात्र, गावासाठी काही तरी करण्याच्या ओढीने या निवडणुकीत उभे राहिल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील पाच वर्षांत निर्भेळ कारभार करू, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना विजयी मिरवणुकीत दिले आहे.