जुन्याच भावाने विकावा लागणार २.१० मे.टन खताचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:13 AM2021-05-21T04:13:02+5:302021-05-21T04:13:02+5:30

अमरावती : खरीपाच्या तोंडावर खताच्या किमती वाढल्यानंतर एकच गहजब उडाला आहे. विक्रेत्यांकडे शिल्लक असलेला रासायनिक खताचा साठा जुन्याच भावाने ...

2.10 MT of fertilizer stock will have to be sold at the same price | जुन्याच भावाने विकावा लागणार २.१० मे.टन खताचा साठा

जुन्याच भावाने विकावा लागणार २.१० मे.टन खताचा साठा

Next

अमरावती : खरीपाच्या तोंडावर खताच्या किमती वाढल्यानंतर एकच गहजब उडाला आहे. विक्रेत्यांकडे शिल्लक असलेला रासायनिक खताचा साठा जुन्याच भावाने विकण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे विभागात जुना शिल्लक असलेल्या २.१० मे. टन खताच्या विक्रीवर विभागातील ६२ भरारी पथकांचा वॉच राहणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पश्चिम विदर्भाकरिता यंदा कृषी आयुक्तालयाकडून ६,०८,०९० मे.टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आलेले आहे. त्यात रासायनिक खताच्या कंपनींद्वारा यंदा दरवाढ केलेली आहे व पुरवठा होणाऱ्या सर्व खताची विक्री ही नव्या दराने होणार आहे. ७ मेपर्यंत विभागाला ६७,६१७ मे.टन खताचा पुरवठा झालेला आहे. यामध्ये युरिया १७,०७६ मे.टन, डीएपी ८,३९६ मे.टन, एमओपी २,७७६ मे.टन, एसएसपी १६,१९० मे.टन, संयुक्त खते २३,१७० मे.टन खताचा समावेश आहे. एकूण मागणीच्या तुलनेत ५,३५३ मे.टन खताचा पुरवठा कमी झालेला आहे. सध्या सर्वच जिल्ह्यात असलेल्या संचारबंदीमुळे खताची उचल झालेली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत २,६२,२८३ मे. टन रासायनिक खते विक्रेत्यांकडे शिल्लक आहेत.

बॉक्स

खतनिहाय शिल्लक साठा

अमरावती विभागात सद्यस्थितीत २,१०,०२७ मे.टन रासायनिक खताचा साठा शिल्लक आहे. यामध्ये युरिया ३९,३१२ मे.टन, डीएपी १२,२२६ मे.टन, एमओपी ९,२९४ मे.टन, एसएसपी ६१,८५५ मे.टन, संयुक्त खते ८६,२४२ मे.टन व मिश्र खतामध्ये १,०९८ मे.टन साठा शिल्लक आहे व या खतांची नव्या दराने विक्री होऊ नये, यासाठी पथकांद्वारा तपासणी होणार आहे.

Web Title: 2.10 MT of fertilizer stock will have to be sold at the same price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.