महिलेच्या पर्समधील २१ हजारांचे दागिने चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:38+5:302021-06-20T04:10:38+5:30

अमरावती : सराफा बाजारात महिलेच्या पर्समधील २१ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. महिलेने ६ ग्रॅम ...

21,000 jewelery stolen from woman's purse | महिलेच्या पर्समधील २१ हजारांचे दागिने चोरी

महिलेच्या पर्समधील २१ हजारांचे दागिने चोरी

Next

अमरावती : सराफा बाजारात महिलेच्या पर्समधील २१ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. महिलेने ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व चांदीच्या तोरड्या पर्समध्ये ठेवल्या होत्या. चैनला डाग लावण्याकरिता त्या सराफा बाजारात गेल्या होत्या. दरम्यान अज्ञात महिला चोराने पर्स लंपास केली. महिलेच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

00000000000000000000000000

वाहतुकीस अडथळा केल्याने तिघांवर गुन्हा

अमरावती : रस्त्यावर ऑटो उभे करून वाहतुकीस अडथळा केल्याने सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी तीन चालकांविरुध्द भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदविला. राजिक हुसैन अखलाल हुसैन (२५ रा. मौलाना आझाद कॉलनी), आदहर खान मजिद खान (२४ रा. रतनगंज) व अभय चरणदास शामकुवर (२९ रा. मिलचाळ, बडनेरा) यांचा आरोपींत समावेश आहे. त्यांना समजपत्रावर सोडण्यात आले.

0000000000000000000000000000

तीन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी शुक्रवारी विविध ठिकाणी तीन अवैध दारू विक्रेत्यांना अटक करून, त्यांच्याजवळील दारूचा मुद्देमाल जप्त केला. फ्रेजरपुरा पोलिसांनी संजय गांधीनगरात धाड टाकून दिलीप विठोबा घोडे (६२ रा. संजय गांधीनगर) याच्याकडून ४८० रुपयांची दारू जप्त केली. बडनेरा पोलिसांनी निंभा येथील संदीप देवराव चौधरी याच्या घरी धाड टाकून ५४० रुपयांची दारू जप्त केली. कवठा बहाळे येथील अशोक नारायण माथने (४०) याच्या घरातून ६०० रुपयांची अवैध दारू जप्त केली.

Web Title: 21,000 jewelery stolen from woman's purse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.