कोरोना संसर्गात सारीचे 2128 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:00 AM2020-12-14T05:00:00+5:302020-12-14T05:00:34+5:30

सर्दी, ताप, खोकला याशिवाय श्वसनास त्रास आदी सर्व कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे सारीवर आरोग्य यंत्रणाद्वारे विशेष लक्ष देण्यात आले. किंबहुना याविषयी राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील यांचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सारी रुग्णांसाठी स्वतंत्र वाॅर्ड व स्वतंत्र नोंदी ठेवण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेस केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा  सामान्य रुग्णालयात स्वतंत्र तीन वाॅर्ड व येथील पीडीएमसी रुग्णालयात दोन वाॅर्डांत सारीच्या रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.

2128 patients of Sari in corona infection | कोरोना संसर्गात सारीचे 2128 रुग्ण

कोरोना संसर्गात सारीचे 2128 रुग्ण

Next
ठळक मुद्देचाचण्यांमध्ये ४१३ कोरोना पॉझिटिव्हची नोंद

  लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाकाळात कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या ‘सारी’ (सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी ईलनेस) आजाराचे तब्बल २,१२८ रुग्ण जिल्हाभरात आढळून आले आहेत. यापैकी ४१३ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला व १६ रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, सारी आजारानेही २५० वर रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रमाण कोरोनाच्या डेथ रेटच्या १० पट अधिक आहे. 
सर्दी, ताप, खोकला याशिवाय श्वसनास त्रास आदी सर्व कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे सारीवर आरोग्य यंत्रणाद्वारे विशेष लक्ष देण्यात आले. किंबहुना याविषयी राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील यांचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सारी रुग्णांसाठी स्वतंत्र वाॅर्ड व स्वतंत्र नोंदी ठेवण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेस केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा  सामान्य रुग्णालयात स्वतंत्र तीन वाॅर्ड व येथील पीडीएमसी रुग्णालयात दोन वाॅर्डांत सारीच्या रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत सारीच्या १,९९८ रुग्णांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ४१३ नमुने पॉझिटिव्ह आले. २५० रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कोरोनाचे १८,५९५ रुग्ण असताना ३८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.   सप्टेंबर ते ऑक्टोबर या ३१ दिवसांत सारीच्या ७७५ रुग्णांची नोंद झाली आहे. 

सारीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड
जिल्ह्यात अधिक प्रमाणात सारीच्या रुग्णांची नोंद होत असल्याने कोरोना संसर्गाच्या सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजारासाठी स्वतंत्र दोन वाॅर्डांची व्यवस्था करण्यात आली. रुग्णसंख्या वाढताच पुन्हा एक वाॅर्ड सुरू करण्यात आला. याशिवाय पीडीएमसीतदेखील सारी आजारासाठी दोन वाॅर्ड तयार करण्यात आले. या वाॅर्डसाठी स्वतंत्र आरोग्य कर्मचारी व वाॅर्डात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची सुविधा करण्यात आली आहे.

सध्या सारीचे रुग्ण कमी येत आहेत. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण जास्त होते. या आजाराच्या रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र तीन वाॅर्ड व पीडीएमसीमध्ये दोन वाॅर्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येते. यामध्ये ४१३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: 2128 patients of Sari in corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.