खरीपासाठी २,१४५ कोटी पीक कर्ज

By admin | Published: March 22, 2016 12:25 AM2016-03-22T00:25:19+5:302016-03-22T00:25:19+5:30

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज वाटप व्हावे यासाठी वार्षिक प्रारुप आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला आहे.

2,145 crore crop loan for Kharif | खरीपासाठी २,१४५ कोटी पीक कर्ज

खरीपासाठी २,१४५ कोटी पीक कर्ज

Next

वार्षिक पतपुरवठा आराखडा : जून २०१६ पर्यंत पूर्ण कर्ज वाटपाचे निर्देश
अमरावती : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज वाटप व्हावे यासाठी वार्षिक प्रारुप आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला आहे. या आराखड्यानुसार यंदाच्या खरीप हंगामासाठी २ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना २ हजार १४५ कोटी रुपयांचे पिककर्ज वाटपाची प्राथमिकता ठेवण्यात आली आहे.
बॅँकाद्वारा जून २०१६ पर्यंत संपूर्ण पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या पतपुरवठा आराखड्यात एकूण ३ हजार ४७८ कोटी ८२ लाखपैकी ३ हजार २९६ कोटी रुपये प्राथमिकता प्राप्त क्षेत्रासाठी ठेवण्यात आले आहे.
यापैकी पिक कर्जासाठी २६ हजार १४५ कोटी ६८ लाख रुपए ठेवण्यात आले आहे. ही ६५ टक्केवारी आहे. कृषी मुदती कर्जासाठी ५३९ कोटी ३३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. ही १६ टक्केवारी आहे. बिगर शेतीकर्जासाठी २३४.३० कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. ही ७ टक्केवारी आहे.
शैक्षणिक कर्जासाठी ४८ कोटी २४ लाख ठेवण्यात आले अहे. ही २ टक्केवारी आहे. गृहकर्जासाठी २४९ कोटी ९३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. ही टक्केवारी व इतर प्राथमिकता क्षेत्रासाठी ७९ कोटी २२ रुपये या आराखड्यात ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा अग्रणी बॅँक अधिकारी सुनील रामटेके यांनी दिली.

शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी
शेतकरी बँकेत येतो. तेव्हा त्यांच्याशी बोला, त्यांना सन्मानाची वागणूक द्या. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक बॅँकेच्या शाखेने मेळावे घ्यावेत.या मेळाव्यात शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती द्यावी.महाराजस्व अभिानात बॅँकांनी स्टॉल लावावे व कर्जाविषयी माहिती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
सहा पीककर्ज मेळावे घेण्याचे निर्देश
शेतकरी दुष्काळ अवकाळीच्या नुकसानीमुळे चिंतेत आहे. त्यांना तातडीने कर्ज पुरवठा केल्यास खरीप हंगामासाठी उपयुक्त होईल. यासाठी एप्रिल २०१६ च्या पहिल्या आठवड्यापासून कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात करावी व प्रत्येक महिन्यात दोन या प्रमाणे सहा कर्ज मेळावे द्यावेत व जून पर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: 2,145 crore crop loan for Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.