जिल्ह्यात मूलभूत सुविधांसाठी २२ कोटींना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:11 AM2021-04-25T04:11:59+5:302021-04-25T04:11:59+5:30

अमरावती : जिल्ह्यात मूलभूत सुविधांच्या कामांसाठी एकूण २२ कोटी रुपयांच्या निधीला ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात ...

22 crore sanctioned for basic facilities in the district | जिल्ह्यात मूलभूत सुविधांसाठी २२ कोटींना मान्यता

जिल्ह्यात मूलभूत सुविधांसाठी २२ कोटींना मान्यता

Next

अमरावती : जिल्ह्यात मूलभूत सुविधांच्या कामांसाठी एकूण २२ कोटी रुपयांच्या निधीला ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात अनेक गावांमधील रस्ते, पांदण रस्ते, नाली, पूल, सभागृह, सौंदर्यीकरण अशा विविध कामांचा समावेश असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या गावांतर्गत मूलभूत विकासाच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा ना. ठाकूर यांनी वेळोवेळी केला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकासकामांसाठी एकूण २२ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक खेडोपाडी रस्ते, पांदण रस्ते, नाली, पूल, स्मशानभूमी कुंपण, ग्रामपंचायत भवन, सभागृह बांधकाम, वॉर्ड सौंदर्यीकरण, खोलीकरण, पेव्हर, रस्ता, रिटनिंग वॉल बांधकाम, पुतळा सौंदर्यीकरण, शेड अशी अनेक कामे त्यामुळे पूर्णत्वास जातील. संबंधित सर्व यंत्रणांनी गावोगावी मूलभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करावीत. यानंतरही अपेक्षित कामांचा वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल. जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

बॉक्स

मोर्शी तालुक्यात होणार विकासकामे

मोर्शी तालुक्यात हिवरखेड,बेलोना, उमरखेड, लाखारा, दापोरी, डोंगरपावली, घोडदेव, पाळा, सालबर्डी, धानोरा, तरोडा, भुईकुंडी, खानापूर, चिखलसावंगी, माणिकपूर, भाईपूर, मायवाडी, चिंचोली गवळी, अंबाडा, आष्टगाव, वरला, उतखेड, खेड, डोमक, तरोडा, आष्टोली, गणेशपूर, पिंपरी, अर्धमनेरी, सायवाडा, कोळविहीर, रायपूर, दहसूर, दुर्गवाडा, पारडी, नशीदपूर, सिंभोरा, येवती, पिंपळखुटा मोठा, निंभी, तळणी, खोपडा, बोडणा, लाडकी, इनापूर, पिंपळखुटा लहान, येरला, आसोना, रिद्धपूर, ब्राम्हणवाडा, बऱ्हाणपूर, दाभेरी गावांचा समावेश आहे.

बॉक्स

वरुड, चांदूर बाजार, नांदगावलाही चालना

वरूड तालुक्यातील गोरेगाव, पांढरघाटी, नागझिरी, पळसोना, धामणधस, माणिकपूर, धनोडी, बहादा, मांगोना, तिवसाघाट, पिंपळशेडा, झटामझिरी, भेंमडी मोठी, भेंमडी लहान, वाळा, वाई खुई, सातनूर, चांदूरबाजार तालुक्यात घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, करजगाव व देवमाळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वाघोडा, महिमापूर, बोरी व नागापूर येथेही सभागृहासाठी प्रत्येकी १३ लाख मंजूर आहेत.

बॉक्स

अंजनगाव तालुक्यातील विविध कामे

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा, तुरखेड, लखाड, टाकरखेडा मोरे, काकडा, देवगाव खोडगाव, चिंचोली बु., चौसाळा, पिंपळगव्हाण, डोंबाळा, निमखेड आडे, वरूड खु, काळगव्हाण, दर्यापूर तालुक्यातील राजखेड, एरंडगाव, शिरजदा, लासूर, वडनेर गंगाई, रामागड भुरस, अचलपूरमधील असदपूर, येसुर्णा, येवता, रावळगाव यासह जोगर्डी, खैरी, वासनी खु., टोंगलाबाद, मुन्हा, जसापूर, गोळेगाव, निमखेड बाजार, बोराळा, अडुळा बाजार आदी गावांचा समावेश आहे.

बॉक्स

तिवसा मतदारसंघातील कामांचाही समावेश

कठोरा, वाठोडा खुर्द, शेंदोळा, मार्डी, तळेगाव ठाकूर, कौंडण्यपूर, ममदापूर, रेवसा, कामुंजा, पालवाडी, वणी, सुलतानपूर, कुऱ्हा, अनकवाडी, मार्डी, मोझरी, माहुली जहांगीर, पुसदा, देवरी, वरखेड, गुरुदेवनगर, उंबरखेड, भिवापूर, शेवती, माळेगावला प्रवासी निवारा, कठोरा बु., कुंड, करजगाव, नांदुरा किरकिटे, वाठोडा शुक्लेश्वर, वायगाव, बुधागड, पूर्णानगर, खोलापूर, निरूळ, साऊर, जळका, तुळजापूर, कवठाळ, विचोरी, घोडगव्हाण, रोहणखेडा आदी गावांचा समावेश आहे.

Web Title: 22 crore sanctioned for basic facilities in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.