२२ गॅस बॉम्बचा भडका

By admin | Published: February 5, 2017 12:02 AM2017-02-05T00:02:55+5:302017-02-05T00:02:55+5:30

गरीब असो वा श्रीमंत, आज बहुंताश घरातील स्वयपांक गृहात गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. हे गॅस बॉम्ब सुरक्षित आहेत का?

22 explosions of gas bomb | २२ गॅस बॉम्बचा भडका

२२ गॅस बॉम्बचा भडका

Next

एक मृत, सात भाजले : अग्निशमन दलाचा वर्षभराचा अहवाल
वैभव बाबरेकर अमरावती
गरीब असो वा श्रीमंत, आज बहुंताश घरातील स्वयपांक गृहात गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. हे गॅस बॉम्ब सुरक्षित आहेत का? त्यांच्या सुरक्षेची काळजी कशी घ्यावी, ग्राहकांना याबाबत माहिती आहे का, ही बाब जाणून ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी गॅस कंपनीसह वितरकांची आहे. मात्र, मार्गदर्शनाअभावी अनेकांना अपघाताची झळ सोसावी लागते. १३ महिन्यांत गॅस सिलिंडर भडक्याच्या २२ घटना घडल्यात. एका विद्यार्थिंनीचा बळी गेला. सात जण गंभीर भाजले.

१३ महिन्यांत ३४१ आगीच्या घटना
अमरावती : लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात तीन विविध कंपन्यांचे गॅस सिडिंलर उपलब्ध आहेत. ४१ गॅस वितरकांमार्फत ४ लाख ५० हजार ग्राहकांपर्यंत सिलिंडरचा पुरवठा होतो. यासाठी हजारो डिलिव्हरी बॉय कार्यरत आहेत. त्यांना गॅस वितरकांकडून तशा सूचनाही दिल्या जातात. मात्र, गॅस वितरक ते सिलिंंडर विक्रीपर्यंत भूमिका पार पाडतात, तर डिलिव्हरी बॉय हे घरपोच सिलिंडर पुरवठ्याची जबाबदारी पार पाडतात. मात्र, सिलिंडरचे वजन करून देणे किंवा ते सुरक्षित असल्याची खात्री ग्राहकांना करून देण्याची तसदीसुद्धा डिलिव्हरी बॉय घेत नाही. ही बाब ग्राहकांच्या जीवावर बेतणारी ठरू शकते, अशाप्रकारच्या हलगर्जीपणाच्या कारभारांमुळे जीव गेलेत, अनेकांच्या जीवनाला झळा बसल्या, तर लाखोंचे नुकसान सहन करावे लागले, अशा घटना अनेकदा समोर आल्या आहेत. 'लोकमत'ने सिलिंडर भडका व स्फोटाच्या घटनांविषयी माहिती जाणून घेतली असता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अग्निशमन विभागाने तब्बल २२ ठिकाणी सिलिंडर भडक्याने आगी लागल्याच्या नोंदी घेतल्या आहेत. १ जानेवारी २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीत शहरात १३ महिन्यात ३४० आगीच्या घटना घडल्या असून विविध कारणाने आगी लागल्या. त्यामध्ये २२ ठिकाणच्या आगी या केवळ सिलिंडरचा भडका उडाल्याने लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी गॅस सिलिंडरच्या वापरावेळी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

गॅस कंपनीसह ग्राहकांचीही जबाबदारी
गॅस कंपनीमार्फत सिलिंडरच्या सुरक्षेबाबत सर्व प्रकारे काळजी घेतली जाते. ग्राहकांना वारंवार सिलिंडरच्या सुरक्षेबाबत सांगण्यात येते. मात्र, ग्राहक गॅस सिलिंडरच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. वितरकांंनी दिलेल्या माहिती व सूचनेप्रमाणे गॅसचा वापर केल्यास अपघात टळू शकतो. ग्राहकांनी डिलिव्हरी बॉयकडून सुरक्षेबाबत खात्री करून घेणे गरजेचे आहे.

गॅस गोडावूनवरूनही
दिले जाते सिलिंडर
गॅस सिलिंडर नम्बर लावण्याची पद्धत आता आॅनलाईन झाली आहे. ग्राहकांनी नम्बर लावल्यानंतर गॅस वितरकांमार्फत गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. मात्र, अनेक ग्राहकांना आजही गॅस गोडावूनमधून सिलिंडरचा पुरवठा केला जातो. रवि नगरात घडलेल्या घटनेत संबंधित ग्राहकाने गॅस गोडावूनमधून सिलिंडर घेतले होते. ते सिलिंडर शेगडीला लावल्यानंतर हा गॅसचा भडका उडाला होता. यात तिघे भाजले गेले.

नागरिकांनी सिलिंडर घेतल्यानंतर ते सुरक्षित आहे का, याची खात्री करूनच घेतली पाहिजे. गॅस लिकेजचा थोडाही संशय आल्यास तत्काळ गॅस वितरक किंवा अग्निशमन विभागाला कळवावे. तेव्हाच जीवितहानी टाळणे शक्य होईल.
- नरेंद्र मिठे, प्रभारी अग्निशमन अधीक्षक

Web Title: 22 explosions of gas bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.