गोवंशातील २२ जनावरांची सुटका
By admin | Published: May 10, 2017 12:09 AM2017-05-10T00:09:47+5:302017-05-10T00:09:47+5:30
गुन्हे शाखा व महापालिकेच्या पथकाने मंगळवारी पहाटे ३ वाजता नवसारी रिंंगरोडवर नाकाबंदी करून गोवंशाची निर्दयतेने वाहतुक करणारी तीन वाहने जप्त केली.
सहा आरोपींना अटक : पोलीस, मनपा गोवंश हत्याबंदी अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गुन्हे शाखा व महापालिकेच्या पथकाने मंगळवारी पहाटे ३ वाजता नवसारी रिंंगरोडवर नाकाबंदी करून गोवंशाची निर्दयतेने वाहतुक करणारी तीन वाहने जप्त केली. यामध्ये २२ जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई पीएसआय अयुब शेख यांच्या पथकाने केली.
पोलीस व महापालिका प्रशासनाकडून मंगळवारी पहाटे ३ वाजता राजपुत धाब्याजवळ नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान वाहन क्रमांक एमएच २७-एक्स-४००७, एमएच २७ एक्स २३८ व एमएच २७ एक्स ५७३९ मधून बैलांची निर्दयतेने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तीनही वाहने थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये बैल कोंबून नेले जात होते. पोलिसांनी वाहनचालकाची चौकशी केली असता त्याच्याजवळ गोवंशाची वाहतूक व खरेदी -विक्रीसंदर्भात कोणतीही परवानगी नसल्याचे दिसले. याप्रकरणात पोलिसांनी अ.ऐहजाज अ.कादर, मुस्तकिंग खान कय्युम खान, वसिद अहेमद अ.सईद, अब्दुल रफीक अ. रजीम व कासम शहा हसम शहा यांच्यासह अन्य एका आरोपीला अटक करून त्यांच्याजवळील तीनही वाहने जप्त करण्यात आली. सहाही आरोपींना गुन्हे शाखेचे पीएसआय अय्युब शेख यांनी गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हे दाखल केले आहे.