महादेवखोरीत २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 05:00 AM2021-07-22T05:00:00+5:302021-07-22T05:01:01+5:30

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तरुणांचा मोठा जमाव जमला असून, पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. काही प्रत्यक्षदर्शींनुसार मारेकऱ्यांची संख्या पाच ते सहाच्या घरात असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी रक्ताने माखलेली एक दुचाकी घटनास्थळाहूून जप्त केली आहे. या घटनेला जुन्या वैमनस्याची किनार असल्याचे सांगण्यात आले. 

22 year old youth brutally murdered in Mahadevkhori | महादेवखोरीत २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

महादेवखोरीत २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

Next
ठळक मुद्देफ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तणाव, आरोपींची धरपकड

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महादेवखोरीतील वरुणनगरात २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. जुने वैमनस्य व क्षुल्लक वादातून बुधवारी दुपारी ४.३०  च्या सुमारास ही घटना घडली. प्रणय मधुकर सातनुरकर (२२, रा. महादेवखोरी) असे मृताचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुराचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस सूत्रांनुसार, प्रणयवर दोन ते तीन युवकांनी चाकूने प्राणघातक हल्ला चढविला. यात त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले. परिणामी, त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. 
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तरुणांचा मोठा जमाव जमला असून, पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. काही प्रत्यक्षदर्शींनुसार मारेकऱ्यांची संख्या पाच ते सहाच्या घरात असल्याचा दावा करण्यात आला. 
दरम्यान, पोलिसांनी रक्ताने माखलेली एक दुचाकी घटनास्थळाहूून जप्त केली आहे. या घटनेला जुन्या वैमनस्याची किनार असल्याचे सांगण्यात आले. 
घटनास्थळी पंचनामा करण्यासोबतच आरोपींना अटक करण्यासाठी तातडीने सूत्रे हलवून पथके गठित केल्याची माहिती ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी दिली.

गँगवारमधून हत्या?
प्राथमिक माहितीनुसार, महादेवखोरी व परिसरात ‘दादागिरी’ करणाऱ्या दोन टोळ्या आहेत. कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्यांच्यात वाद होत असतात. काही तरुणांचा समावेश असलेली एक गँग दुसऱ्या गँगमधील तरुणांशी वाद करण्याकरिता जात असताना प्रणयचा बळी गेल्याचे सांगण्यात आले. 

दीड महिन्यात तिसरा खून
जुन्या वादातून दारू पिताना झालेल्या शाब्दिक वादातून जेवडनगरातील ४५ वर्षीय तडीपार गुंडाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती.  मारेकऱ्यांनी दगड डोक्यात घातल्याने घटनास्थळी रक्ताने माखलेला मृतदेह पडून होता. ती घटना ४ जूनला छत्री तलावाजवळील जंगल परिसरात घडली होती. १ जुलै रोजी सायंकाळी हमालपुरा येथे ३२ वर्षीय तरुणावर चाकूने वार करण्यात आले. उपचारादरम्यान आकाश वलन (३२, रा. आदिवासी कॉलनी) याचा मृत्यू झाला. त्या घटनेला २० दिवस होत नाही तोच बुधवारी पुन्हा एका तरुणाच्या हत्येची घटना महादेवखोरी परिरसरात उघड झाली. विशेष म्हणजे, दगावलेले तिघेही तरुण आहेत. 

 

Web Title: 22 year old youth brutally murdered in Mahadevkhori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.