मेळघाटात रुग्णवाहिकांमध्ये २२० प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:11 AM2020-12-25T04:11:54+5:302020-12-25T04:11:54+5:30
मेळघाटात आदिवासींना शिक्षणासह आरोग्य सुविधा पिरविण्याकरिता शासन सकारात्मक असून, त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता विविध शासकीय योजना तेथे राबविण्यात येतात. मेळघाटातील ...
मेळघाटात आदिवासींना शिक्षणासह आरोग्य सुविधा पिरविण्याकरिता शासन सकारात्मक असून, त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता विविध शासकीय योजना तेथे राबविण्यात येतात. मेळघाटातील दऱ्याखोऱ्यात समूहाने वास्तव्य करीत असलेल्या आदिवासींच्या गावागावांत रस्त्यांची निर्मिती झाली नसल्याने व वाहनांची सुविधा नसल्याने रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने शासनाने शासकीय रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याअनुषंगाने सात अँब्युलंस आणि पायलट व डॉक्टर्सची सोय केलेली आहे. तसेच रस्त्यांअभावी रुग्णवाहिका जेथे पोहोचू शकत नाही तेथे २८ जुलै २०१८ पासून पाच बाईक अँब्युलंसची सोय करण्यात आलेली आहे. मात्र, शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धेला अधिक बळ देणाऱ्या आदिवासी नागरिकांचा आरोग्य विभागापेक्षा भूमकावर अधिक विश्वास असल्याचे दिसून येत आहे. अशातच अगदी प्रसूतीची वेळ जवळ येईपर्यंत स्तनदा मातेची आरोग्य विभागात जाण्याची तयारी नसते. ऐनवेळी त्रास असह्य वाटू लागल्यास अँब्युलंसने प्राथमिक आरोग्य केंद्र गाठण्याचा प्रयत्न केला जातो. अशातच रस्ते खडबडीत असल्यामुळे वाटेतच प्रसूती होण्याचा प्रकार सन २०१४ ते २०२० दरम्यान तब्बल २२० वेळा घडल्याचे वास्तव आहे.
बॉक्स
५६ हजारांवर रुग्णांना सेवा
मेळघाटात सात वर्षांत ५६३५२ रुग्णांना अँब्युलंसद्वारे सेवा पुरविण्यात आली. यामध्ये ८४११ प्रसूतांचा समावेश आहे. चिखलदरा तालुक्यातील ५८१० रुग्णांना सेवा दिली आहे. कोरोना काळात मेळघाटातील ९५१४ रुग्णांना बाईक अँब्युलंसद्वारा सेवा देण्यात आल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र अब्रुक यांनी लोकमतला दिली.
कोट
-----
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक