२२६७ विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:36 PM2018-12-14T22:36:28+5:302018-12-14T22:37:07+5:30

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ९ हजार ३०२ विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून पासचे वितरण करण्यात आले आहे. मोर्शी तालुक्यात २२६७ लाभार्थी आहेत. या सवलतीमुळे टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

2267 students travel free ST | २२६७ विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास

२२६७ विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ९,३०२ लाभार्थी : दुष्काळग्रस्त भागातील मुलांना होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ९ हजार ३०२ विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून पासचे वितरण करण्यात आले आहे. मोर्शी तालुक्यात २२६७ लाभार्थी आहेत. या सवलतीमुळे टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अचलपूर तालुक्यात २ हजार ५५१, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ५४५, चिखलदरा तालुक्यातील ८०, मोशीर्तील २ हजार २६७ आणि वरूडमधील ३ हजार ८५९ अशा एकूण ९ हजार ३०२ विद्यार्थ्यांना पास वितरित करण्यात आल्या आहेत. शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीच्या मासिक पासच्या रूपाने ६६.६७ टक्के सवलत प्रवास भाड्यात दिली जाते. मात्र, दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी १०० टक्के प्रवास सवलत मिळणार आहे. या सवलतीसाठी एसटी महामंडळाच्या अमरावती विभागावर सुमारे ३९ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असला तरीही अडचणीच्या काळात शेतकरी बांधवांना मदत करणे हे एसटीचे कर्तव्य असल्याचे मानून ही सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. दरम्यान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एसटीच्या या उपक्रमाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांपुढे यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. त्यांना एसटी प्रशासनाने दिलासा दिला आहे.

एसटीतून प्रवास करणाऱ्यांमध्ये शेतकरी बांधव व ग्रामीण नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. योजनेचा लाभ शिक्षणासाठी शहरे किंवा मोठ्या गावांत जाणाऱ्या खेड्यापाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांना होत आहे.
- श्रीकांत गभणे, विभागीय नियंत्रक

Web Title: 2267 students travel free ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.