जिल्ह्यांत १२ तासात धावल्या २३ बसगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:01:07+5:30
महामंडळाची जीवनवाहिनी ‘लाल परी’ शुक्रवारी सामान्य प्रवाशांकरिता उपलब्ध होताच, शहरातील मुख्य बाजारपेठेत ये-जा करण्याची सोय झाल्याने ग्रामीण प्रवाशांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले होते. शुक्रवारी सहा आगारांतून २३ बसने ७४ फेºया केल्या. त्यामधून एकूण १२४ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. प्रत्येक बसमधून अवघ्या दोन ते पाच प्रवाशांनी प्रवास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाने दोन महिन्यांनंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजतापासून सामान्य नागरिकांकरिता बससेवा सुरू केली. जिल्ह्यातील सहा आगारांतून दिवसभराकरिता ६१ बसचे नियोजन केले होते. मात्र, १२ तासांत केवळ २३ बस धावल्या. बस स्थानकावर फारशी गर्दी नव्हती. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद होता. बसचे चालक-वाहक व प्रवाशांनी मास्क लावले तसेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आला.
महामंडळाची जीवनवाहिनी ‘लाल परी’ शुक्रवारी सामान्य प्रवाशांकरिता उपलब्ध होताच, शहरातील मुख्य बाजारपेठेत ये-जा करण्याची सोय झाल्याने ग्रामीण प्रवाशांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले होते. शुक्रवारी सहा आगारांतून २३ बसने ७४ फेºया केल्या. त्यामधून एकूण १२४ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. प्रत्येक बसमधून अवघ्या दोन ते पाच प्रवाशांनी प्रवास केला. बस आगारातून इतर ठिकाणी सुटण्यापूर्वी तिचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना एन्ट्री होती. अमरावती महापालिकेचा रेड झोन क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील इतर सहा आगारांतून शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बससेवा सुरू होती.
वाहक-चालकांना सॅनिटायझर व मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. ६५ वर्षांवरील वृद्ध व १० वर्षांखालील मुलांच्या प्रवासाला महामंडळाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंध घातला आहे. मात्र, अत्यावश्यक वैद्यकीय कारणास्तव प्रवास करता येणार आहे.
४७ एसटी बस ९९५ मजूर पोहोचविले
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यांतील कामगारांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील कामगारांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी मागील १२ दिवसांत ४७ एसटी बस धावल्या. या बसमधून ९९५ प्रवाशांना मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूपपणे सोडण्यात आले. पायी जाणाºया मजुरांना ‘लाल परी’ने दिलेल्या सेवेमुळे मजुरांना कुटुंबीयांसह आपल्या राज्यात जाणे सोयीचे झाले. अमरावती विभागातून मध्यवर्ती बस स्थानक, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे या एसटी आगारांमधून ५ ते २० मे दरम्यान राज्य परिवहन महामंडळाकडून ४७ बस सोडण्यात आल्याचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.