२३ मेला आपलीच सावली सोडणार आपली साथ; झिरो शॅडो डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 04:03 PM2023-05-10T16:03:50+5:302023-05-10T16:04:26+5:30
मराठी विज्ञान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची माहिती
अमरावती : सूर्य, पृथ्वीचा मध्य आणि आपले शहर जेव्हा एकाच रेषेत येतात, त्यावेळी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावरून जातो. यावेळी उन्हात असलेल्या व्यक्तीची किंवा वस्तूची सावली पुढे-मागे न पडता त्याच्या पायातच पडते. त्यामुळे काही क्षण सावली गायब होते. या घटनेला खगोल शास्त्रीय भाषेत ‘शून्य सावली’ (झिरो शॅडो) म्हटले जाते. अमरावतीकरांना हा अनुभव २३ मे रोजी घेता येणार आहे.
सूर्य वर्षभर दुपारी बाराच्या दरम्यान आपल्या डोक्यावर असतो. प्रत्यक्षात मात्र असे घडत नाही. ही सावली पायाच्या थोडीशी आजूबाजूला पडते. सूर्य रोज थोडासा उत्तर किंवा दक्षिणेकडे असतो. वर्षातील दोनच दिवस असे असतात. ज्यावेळी सूर्य बरोबर ९० अंश कोनात डोक्यावर येतो. सूर्य २१ जूनपर्यंत कर्कवृत्तापर्यंत प्रवास करून दक्षिणेकडे परत जातो. मग पुन्हा २१ जुलैला ही घटना पुन्हा घडते. परंतु, त्या महिन्यात भारतात पावसाळा असतो. त्यामुळे आपल्याला हा अनुभव घेता येत नाही.