बाजार समिती संचालकांसह २३ जणांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:05 PM2018-06-15T22:05:37+5:302018-06-15T22:05:48+5:30

स्थानिक बाजार समितीच्या आवारात पकडलेल्या कत्तलीच्या जनावरांच्या प्रकरणात शुक्रवारी बाजार समितीच्या २२ संचालकांसह सचिव अशा २३ जणांचे पोलिसांनी बयान नोंदविले. या चौकशीने संपूर्ण बाजार समिती हादरून गेली आहे.

23 people inquired with market committee directors | बाजार समिती संचालकांसह २३ जणांची चौकशी

बाजार समिती संचालकांसह २३ जणांची चौकशी

Next
ठळक मुद्देजनावरांचे अवैध वाहतूक प्रकरण : चौकशीदरम्यान खालावली सचिवांची प्रकृती

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : स्थानिक बाजार समितीच्या आवारात पकडलेल्या कत्तलीच्या जनावरांच्या प्रकरणात शुक्रवारी बाजार समितीच्या २२ संचालकांसह सचिव अशा २३ जणांचे पोलिसांनी बयान नोंदविले. या चौकशीने संपूर्ण बाजार समिती हादरून गेली आहे.
स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये पोलिसांनी रविवारी सायंकाळी कत्तलीसाठी नेत असलेली २२ जनावरे पकडली. या प्रकरणात बाजार समिती सचिवांसह सर्व २२ संचालकांना चौकशीकरिता पोलीस ठाण्यात शुक्रवारी पाचारण केले. यामध्ये सभापती प्रवीण वाघमारेसह सचिव मनीष भारंबे यांची बंदद्वार चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान सचिव भारंबे यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सर्वप्रथम महिला संचालकांची चौकशी झाली. तज्ज्ञ संचालकांचीही चौकशी करण्यात येत आहे. घटनेस जबाबदार व दोषींवर लवकरच गुन्हे नोंदविले जाण्याचा विश्वास ठाणेदारांनी व्यक्त केला.
यासंदर्भात सभापती प्रवीण वाघमारे यांच्या संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

Web Title: 23 people inquired with market committee directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.