सहलीचे आमिष दाखवून २३ महिलांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:58 PM2017-12-27T22:58:46+5:302017-12-27T22:59:09+5:30

बौद्ध दर्शन सहलीचे आमिष दाखवून २३ महिलांची १ लाख ४४ हजारांनी फसवणूक करण्यात आली.

23 women cheated by showing bait for pilgrimage | सहलीचे आमिष दाखवून २३ महिलांची फसवणूक

सहलीचे आमिष दाखवून २३ महिलांची फसवणूक

Next
ठळक मुद्देव्यंकैयापुरातील घटना : फे्रजरपुरा ठाण्यात गुन्हा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : बौद्ध दर्शन सहलीचे आमिष दाखवून २३ महिलांची १ लाख ४४ हजारांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी व्यंकैयापुरा येथे उघडकीस आली. याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून, घनश्याम डवरे (रा. डेबुजीनगर) याला अटक केली आहे.
व्यंकैयापुºयातील रहिवासी लीला चरणदास तागडे (५०) यांच्यासह २३ महिलांनी बौद्ध दर्शन सहलीला जाण्याचा बेत आखला होता. त्यासाठी प्रत्येक महिलेने सहल आयोजकांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले होते. अशाप्रकारे २३ महिलांनी आयोजकांना १ लाख ४४ हजारांची रक्कम दिली. मात्र, संबंधितांनी सहलीला नेलेच नाही.
महिलांनी पैसे परत मागितले असता, पैसे देण्यास आरोपींनी टाळाटाळ केली. याप्रकरणात लीला तागडे यांनी बुधवारी फे्रजरपुरा पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी घनश्याम डवरे, धीरज डवरे व वर्षा डवरेविरुद्ध फसवणुकीचा गुुन्हा दाखल केला. घनश्याम डवरे याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

Web Title: 23 women cheated by showing bait for pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.