अमरावती येथे २,३५० वाहन चालकांनी केला मोटार वाहन कायद्याचा भंग, RTOच्या भरारी पथकाची कारवाई

By गणेश वासनिक | Published: July 16, 2023 04:06 PM2023-07-16T16:06:59+5:302023-07-16T16:07:26+5:30

Amravati: वाहनचालकांचे अनेक माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. तरीही वाहनचालक पाहिजे त्या प्रमाणात वाहन चालविण्याबाबत व वाहनाचे विधीग्राह्य कागदपत्रे जवळ न बाळगता मोटार वाहन कायदा व नियमाचे सर्रास उल्लंघन करतात.

2,350 motorists violated Motor Vehicle Act in Amravati, action taken by RTO team | अमरावती येथे २,३५० वाहन चालकांनी केला मोटार वाहन कायद्याचा भंग, RTOच्या भरारी पथकाची कारवाई

अमरावती येथे २,३५० वाहन चालकांनी केला मोटार वाहन कायद्याचा भंग, RTOच्या भरारी पथकाची कारवाई

googlenewsNext

- गणेश वासनिक
अमरावती -  वाहनचालकांचे अनेक माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. तरीही वाहनचालक पाहिजे त्या प्रमाणात वाहन चालविण्याबाबत व वाहनाचे विधीग्राह्य कागदपत्रे जवळ न बाळगता मोटार वाहन कायदा व नियमाचे सर्रास उल्लंघन करतात. त्यानुसार जून महिन्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीवरून २,३५० वाहन चालकांनी मोटार वाहन कायदा व नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.
जून महिन्यात २,३५० वाहन चालकांकडून दंडात्मक कारवाईत एकूण रुपये ३७ लाख ६७ हजार दंड स्वरुपात रक्कम वसूल करण्यात आली आहे.

समुपदेशन केल्यानंतर वाहनचालक परत परत मोटार वाहन कायदा / नियमाचा भंग करत असतील तर त्यांना न्यायालयीन व दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागते. प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागडी तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक हितेश धावडा, दिनेश सुरडकर, गणेश वरुटे व प्रताप राऊत यांनी ही कारवाई केली.

...असे केले वाहन चालकांनी या नियमांचे उल्लंघन
१) हेल्मेट -६३१
२) वाहनाला परावर्तीत टेप न लावलेली वाहने -११२
३) वाहनाच्या छतावरून सामान वाहून नेणारी वाहने -१
४) ओव्हर डायमेन्शन वाहने -१०
५) शाळेत मुलांना घेऊन जाणारी वाहने- ४
६) हॉर्न / सायरनचे उल्लंघन करणारी वाहने- ३
७) वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणारे वाहन चालक -१८
८) वाहन चालविताना लायसन जवळ न बाळगणारे वाहनचालक - ४२०
०९) चालकांचे लायसन / अनुज्ञप्ती विधीग्राह्यता संपलेले वाहनचालक-३०
१०) वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र सादर न केलेली वाहने - ११
११) फिटनेस प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता संपलेली वाहने-१९३
१२) विमा प्रमाणपत्र सादर न केलेली वाहने -६८
१३) विमा प्रमाणपत्राची मुदत संपलेली वाहने - १५३
१४) वाहनाचे परमिट सादर न केलेली वाहने -०८
१५) परमिटची विधीग्राह्यता संपलेले वाहने -२२
१६) भार क्षमतेपेक्षा अधिक मालवाहून नेणारी वाहने-१२
१७) पीयूसी प्रमाणपत्र सादर न केलेली वाहने- ६०
१८) पीयुसीची विधी ग्राह्यता संपलेली वाहने - १६९
१९) वाहनांच्या नंबर प्लेटवर वाहन क्रमांक नसलेली वाहने-१२३
२०) वाहनाची कागदपत्रे सादर न केल्याने अटकावून ठेवलेली वाहने - १२
२१) इतर नियमांचा भंग / उल्लंघन केलेली वाहने-२९०

Web Title: 2,350 motorists violated Motor Vehicle Act in Amravati, action taken by RTO team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.