२४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:51+5:30
‘लॉकडाऊन’मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित दुकानांच्या संचालकांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाकडून सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा मालाची दुकाने, औषधांची दुकाने ही २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आवश्यक कार्यवाहीच्या अनुषंगाने आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी जारी केला.
‘लॉकडाऊन’मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित दुकानांच्या संचालकांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आरटीओच्या मान्यतेने वाहनांना पासेस
अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून स्टिकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले. त्यानुसार, जीवनावश्यक वस्तूंमध्ये धान्य, औषध, दूध व दुधाचे प्रदार्थ, बे्रड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, पशुखाद्य, कृषिमाल व कृषिसंबंधी साहित्य यांचा समावेश आहे. मालवाहतूकदाराने स्वत:हून त्या मालवाहू वाहनाच्या विंडो स्क्रीनलक स्पष्टपणे जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करीत असल्याचे नमूद करावे तसेच कच्चा माल आणि गोदाम उपक्रम म्हणून प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांना प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून पासेस दिल्या जाणार आहेत. या साहित्याची वाहतूक होणार असल्याने जीवनावश्यक वस्तूंची चणचण भासणार नाही, असे जिल्हाधिकाºयांनी नमूद केले.
अत्यावश्यक सुविधा
वैद्यकीय सेवा - सरकारी, खासगी डॉक्टर, नर्स, सिस्टर
सफाई कर्मचारी, बँक कर्मचारी सर्व बँका, पतपेढ्या
सुरक्षा कर्मचारी - खासगी, सरकारी दोन्ही सिक्युरिटी गार्ड
वीज वितरणाशी संबंधित सेवा
पाणीपुरवठा विभाग
अत्यावश्यक वस्तू निर्माण करणारे कर्मचारी, मालक, सुपयवायझर
शेतमाल, शेतीकामाशी संबंधित शेतमजूर
पत्रकार, फोटोेग्राफर
इंटरनेट सुविधांशी संबंधित कर्मचारी
टेलिफ ोन संबंधित कर्मचारी
अत्यावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी करणारे कर्मचारी
तात्काळ वैद्यकीय सेवेसाठी जाणारे लोक व त्याचे वाहन, गर्भवती महिला, डायलिसीस रूग्ण, अत्यवस्थ रूग्ण, शस्त्रक्रियेसाठी न्यावयाचे रुग्ण
ही सेवा राहणार सुरू
किराणा दुकान भाजीपाला
फळे दूध अंडी,
कृषिसेवा केंद्र
किरकोळ पशुखाद्य विक्री केंद्र