२४ तास ‘तापदायक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:13 PM2018-05-07T23:13:17+5:302018-05-07T23:14:18+5:30

शहरासह जिल्ह्यात कमाल तापमान काही दिवसांपासून वाढत आहे. रविवारी दुपारी पारा ४४ अंशावर पोहचला होता. पुढील तीन दिवस त्यात वाढ होऊन ४५ अंशावर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

24 hours 'irritable' | २४ तास ‘तापदायक’

२४ तास ‘तापदायक’

Next
ठळक मुद्देउष्णतेच्या लाटेचा इशारा : पारा वाढण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरासह जिल्ह्यात कमाल तापमान काही दिवसांपासून वाढत आहे. रविवारी दुपारी पारा ४४ अंशावर पोहचला होता. पुढील तीन दिवस त्यात वाढ होऊन ४५ अंशावर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आठवड्यामध्ये हलक्या पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातच उष्णतेची लाट कायम असल्याने बहुतांश ठिकाणचा पारा ४० अंशाच्या वर आहे.
उत्तर भारत, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण वाºयामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. पुढील काही दिवसांत शहर आणि परिसरातील किमान तापमानात १ ते २ अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. परिणामी उन्हाचा तडाखा परत एकदा वाढेल. शनिवारी पारा ४४ वर स्थिरावला. विदर्भात ब्रह्मपुरी येथे ४५, तर चंद्रपुरात ४४.१ अंश सेल्सीअस पाºयाची नोंद करण्यात आली. बुलडाणा येथे सर्वांत कमी ४१.१ अंश सेल्सीअस तापमान होते. प्रादेशिक हवामान खात्यानुसार पुढील तीन दिवस विदर्भातील सर्वच शहरांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
दोन दिवसानंतर तापमान आणखी वाढणार
भारतात ठिकठिकाणी असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे व द्रोणीय स्थितीमुळे हवामान वेगाने बदल आहे तसेच पुढील दोन दिवसानंतर उष्णतामान वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे. पश्चिम हिमालयावर असलेल्या पश्चिमी विक्षोभाच्या परिणामी हरियाणावर चक्राकार वारे तसेच पश्चिम राजस्थान ते मध्यवर्ती मध्य प्रदेशच्या पूर्व-पश्चिम कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. याच्या प्रभावाने गडगडाटासह पाऊस, वेगवान वारे, तसेच वावटळी येतील. पुढील दोन दिवसांत राज्यातील तापमान ४० ते ४४ डिग्री सेल्सीअस दरम्यान राहणार आहे.
उष्माघाताचा वॉर्ड ‘फुल्ल’
जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्णाघाताच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. कक्षातील वातावरण कूलरद्वारे थंड ठेवण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसांत हा कक्ष उष्माघाताच्या रुग्णांनी फुल्ल झाला आहे. दररोज आठ ते दहा रुग्ण भरती केले जात आहेत. उष्माघाताने एका रुग्णांचा मृत्यू झाला असून, अन्य रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उष्माघाताची लक्षणे
अतिशय थकवा येणे, डोके दुखणे, पोटात दुखणे, उलटी किंवा संडासाचा त्रास, घसा कोरडा पडणे, ताप येणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे यामुळे किडनी व मेंदूज्वर परिणाम होऊन मृत्यू ओढवू शकतो.
जोखमीचे घटक
६५ वर्षावरील व्यक्ती. १ ते ५ वर्षे वयोगटातील मुले. गरोदर माता. मधुमेह व हृदयरुग्ण आणि मद्यपी. अतिउष्ण वातावरणात काम करणारे.
बाळांसाठी ही घ्यावी खबरदारी
उन्हाच्या तीव्रतेचा सर्वाधिक फटका बाळांना बसू शकतो. त्यामुळे मुलांना सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत शक्यतो बाहेर नेऊ नये. त्यांना पाणी भरपूर पाजावे. कॉटनचे कपडे वापरावे. रुमाल बांधून बाहेर काढावे. पाणी, नारळ पाणी, ज्यूस, दही, ताक व सोबत फळे आहारात द्यावे. घट्ट कपडे न घालता, सैलच कपडे घालावे, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ ऋषीकेश नागलकर यांनी दिली.

पालकांनी बाळांची विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. शक्यतो दुपारी त्यांना बाहेर नेऊच नये. भरपूर पाणी पाजावे. आहारात फळे द्यावे, मुलांना थकवा जाणवत असेल, तर वैद्यकीय उपचार द्यावेत.
- ऋषीकेश नागलकर, वैद्यकीय अधिकारी, इर्विन

Web Title: 24 hours 'irritable'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.