२४ हजार शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:15 PM2018-06-15T22:15:01+5:302018-06-15T22:15:10+5:30

24 thousand farmers wind | २४ हजार शेतकरी वाऱ्यावर

२४ हजार शेतकरी वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देहरभरा खरेदी केंद्र बंद : खरेदीदार यंत्रणेने लावली वाट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली. प्रत्यक्षात खरेदीदार यंत्रणेची मंदगती, बारदाना, गोदाम नाही आदी कारणांमुळे बहुतेक दिवशी केंद्र बंद राहिली. सद्यस्थितीत चार केंद्रावरील खरेदी बंदच आहे. अशा स्थितीत १३ जूनला केंद्रांची मुदतवाढ संपुष्टात आल्याने आॅनलाइन नोंदणी केलेल्या २३ हजार ७९२ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
जिल्ह्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात १२ केंद्राद्वारे हरभºयाची खरेदी सुरू झाली. सद्यस्थितीत ३५ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. यापैकी ११ हजार ७६३ शेतकºयांचा १.९१ लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. अद्याप २२ हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करायचा आहे. शासनाने ६ जुन रोजी सर्व केंद्रांना १३ जूनपर्यत मुदतवाढ दिल्याचे पत्र दिले. प्रत्यक्षात केंद्र सुरू करण्याला ८ जून उघडला. त्या ठिकाणी बारदाना व गोदामाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात असे झालेच नाही. मात्र, यंत्रणेद्वारा खरेदीचा वेगच नसल्याने दररोज जवळपास २०० शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यातच आलेला नाही हे वास्तव आहे. मुदतवाढीनंतर अनेक केंद्र बंद असतांना खरेदीची अखेरची मुदत देखील बुधवारी उशिरा संपणार आहे. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या किमान २४ हजार शेतकरी केंद्रांना मुदतवाढ येईल, या प्रतीक्षेत आहेत.
अशी आहे हरभऱ्याची खरेदी
अचलपूर केंद्रावर १२१८ शेतकऱ्यांचा १८१०३ क्विंटल, अमरावती ६०९ शेतकऱ्यांचा १११३५, अंजनगाव सुर्जी १०१६ शेतकऱ्यांचा १७,०४६, चांदूररेल्वे ८५३ शेतकऱ्यांचा १३६२७, चांदूर बाजार १२२५ शेतकऱ्यांचा २२६८३, दर्यापूर २,२३३ शेतकऱ्यांचा ३९,७९९, धारणी ३८६ शेतकऱ्यांचा ६,९०७, नांदगाव खंडेश्वर ३०५ शेतकऱ्यांचा ४,९७६, नांदगाव खंडेश्वर ३०२ शेतकºयांचा ४,९३७, तिवसा ५९० शेतकऱ्यांचा ९,३५३, धामणगाव रेल्वे, मोर्शी ७७३ शेतकऱ्यांचा १२,२४९ व वरूड तालुक्यात ८१५ शेतकऱ्यांचा १०,०३८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

Web Title: 24 thousand farmers wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.