एमसीव्हीसी, द्विलक्षी अभ्यासक्रमाला २५ टक्के कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:30 AM2020-08-14T11:30:57+5:302020-08-14T11:31:15+5:30
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. येत्या शैक्षणिक २०२०-२०२१ या वर्षाकरिता ही नियमावली लागू होणार आहे. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यासाठी सहा विभागस्तरावर समिती नेमण्यात आली आहे.
कोरोना संसर्गामुळे साधारणत: जूनपासून नव्या शैक्षणिक सत्राला आरंभ होणे आवश्यक होते. मात्र, लॉकडाऊन आॅगस्टपर्यंत कायम आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील, हे निश्चित नाही. परंतु, शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याबाबत संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी ११ आॅगस्ट रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयांच्या सहसंचालकांना कळविले आहे. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यासाठी विभागस्तरावर स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे.
विभागनिहाय असे होतील २५ टक्के अभ्यासक्रम कमी
मुंबई - उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम वाणिज्य गटातील सर्व अभ्यासक्रम
पुणे - उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अर्धवैद्यकीय गट व पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम व्ही १, व्ही २, व्ही ३ व व्ही ४
नाशिक - उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम तांत्रिक गटातील सर्व अभ्यासक्रम