जिल्ह्यातील २५ फिडर झाले भारनियमनमुक्त

By Admin | Published: July 1, 2014 11:13 PM2014-07-01T23:13:42+5:302014-07-01T23:13:42+5:30

जिल्ह्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी व नागरिक चांगलेच त्रस्त असताना वीज वितरण कंपनीच्या संदर्भातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मंगळवारी महावितरणचे मुख्य

25 filers of the district became free of charge | जिल्ह्यातील २५ फिडर झाले भारनियमनमुक्त

जिल्ह्यातील २५ फिडर झाले भारनियमनमुक्त

Next

अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी व नागरिक चांगलेच त्रस्त असताना वीज वितरण कंपनीच्या संदर्भातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मंगळवारी महावितरणचे मुख्य अभियंता ताकसांडे यांच्या उपस्थितीत जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या दालनात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील ३१ पैकी २५ सिंगल फेज फिडर भारनियमन मुक्त करण्यात आल्याची माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पावसाने दडी मारल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून ओलिताची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पाणी असतानाही भारनियमनामुळे ओलिताची कामे करता येत नाही. अशातच विजेची संबंधित अनेक समस्यांना सध्या शेतकरी व नागरिक अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. भारनियमन व विजेच्या समस्येबाबत जि.प. अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करुन विजेच्या समस्या व भारनियमनावर तोडगा काढण्याची मागणी रेटून धरली होती. याची दखल घेत अमरावती जिल्ह्यातील ३१ पैकी २५ सिंगल फेज फिडर भारनियमनमुक्त झाले असून याच फिडरला जोडण्यात आले थ्री फेज वीज पुरवठा करणाऱ्या फिडरवर आता दिवसा आठ तास आणि रात्री १० याप्रमाणे वीज पुरवठा होणार असून आठवड्यातील तीन आणि चार दिवस याप्रमाणे वीज पुरवठा केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे सिंगल फेज फिडरवर २४ तास वीज पुरवठा होणार आहे. जि.प. अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी हा प्रश्न लावून धरल्यामुळे संपूर्ण राज्यात सिंगल फेज फिडर भारनियमन मुक्त करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
यावेळी या बैठकीत चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी डीबी ट्रान्सफार्मर तसेच विजेच्या समस्या मांडून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. याशिवाय जि.प. सदस्य सदाशिव फडके यांनी मेळघाटातील भारनियमन व कमी दाबाचा वीज पुरवठा यामुळे पाणी पुरवठा व सिंचनाची कामे पूर्णत: कोलमडून पडल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. सतीश हाडोळे यांनी सिंगल फेज फिडरवरुन थ्री फेजचा विज पुरवठा होत असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे अंजनगाव तालुक्यातील ही समस्या दूर करण्याची मागणी केली. दरम्यान या संदर्भात महावितरणतर्फे येत्या चार दिवसात आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे मुख्य अभियंता ताकसांडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल, कार्यकारी अभियनता मोहोड व शेतकरी उपस्थिती होती.

Web Title: 25 filers of the district became free of charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.